NDA First batch Girl : एनडीएच्या रणरागिणी; सशस्त्र दलांच्या इतिहासात नवा अध्याय Special Report
भारतीय सशस्त्र दलाच्या इतिहासात शुक्रवारी नवा अध्याय जोडला गेला...पहिल्यांदाच १७ महिला कॅडेटची पहिल्या बॅचची पासिंग आऊट परेड झाली...या सगळ्या महिला आता पुरुषांची खांद्याला खांदा लावून देशाच्या सेवेसाठी समर्पण द्यायला सज्ज झाल्यात...पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट...
पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची पासिंग आऊट परेड खरोखर सुवर्णाक्षरात लिहून ठेवावी अशीच आहे. एनडीएतून १७ मुलींच्या पहिल्या तुकडीने लष्करी सेवेची दीक्षा घेतली... तीन वर्षांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करून या १७ महिला कॅडेट्स सैन्यात लेफ्टनंट झाल्या. यात ९ जणी आर्मीत, ३ नेव्हीत तर ५ एअरफोर्समध्ये रुजू होत आहेत.
सुप्रीम कोर्टानं २०२१ मध्ये एनडीएची कवाडं मुलींसाठी खुली केली. त्यानंतर २०२२ मध्ये मुलींची पहिली बॅच परीक्षा पास करून एनडीएमध्ये दाखल झाली. गेली तीन वर्षं या मुलींनी अतिशय खडतर असं लष्करी प्रशिक्षण घेतलं... आज अत्यंत अभिमानाने त्यांच्या खांद्यावर लष्करी अधिकारीपदाचे स्टार्स लागले. एनडीएतून आज ३३९ कॅडेट्स लष्करी सेवेत रुजू झाले. माजी लष्करप्रमुख व्ही के सिंग यांनी या मुलींच्या बॅचचं मोठं कौतुक केलं. सेनादलाच्या सर्वोच्च पदांवर महिला असण्याचा दिवस आता फार दूर नाही असं ते म्हणाले.
All Shows

































