Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report
सुरुवातीला ज्या सिनेमानं राजकारणाच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय... तो सिनेमा.. अर्थातच नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत झालेल्या बंडखोरीचा...य़ा सिनेमात काय नाही?...लव्ह, हेट, इमोशनल ड्रामा, बदल्याची आग, बंडखोरीचा राग...पाहुयात...नाशिकचा हा ब्लॉकबस्टर शो...
एखाद्या सिनेमानं जेवढं महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं नसेल...
त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचवली नसेल...
तेवढं मनोरंजन आणि उत्कंठा,
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय नाट्यामध्ये अनुभवायला मिळाली...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागांसाठी विधान परिषद निवडणुका होताहेत
जवळपास सगळ्याच ठिकाणी महायुतीचं पारडं जड मानलं जातंय
मात्र शिंदेंच्या शिवसेनेला सुटलेल्या नाशिकच्या जागेवर,
नाशकातल्या फेसम गिते बंधूंपैकी, गोकुळ गितेंनी रूमाल टाकला...
आणि तो रूमाल बाजूला सारताना भाजप आणि शिवसेनेच्या संकटमोचकांना चांगलाच घाम फुटला...
अखेर गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी दहा दिवस अथक मनधरणी केल्यानंतर,
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः शब्द दिल्यानंतर...
गोकूळ गितेंनी मनाविरूद्ध का होईना,
पण नाशिक विधान परिषद निवडणुकीतला स्वतःचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतलाय
All Shows





महत्त्वाच्या बातम्या



























