Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका
Prashant Kishor : जन सुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी वंदे मातरमवरुन सुरु असलेल्या वादावर प्रतिक्रिया देत भाजप आणि काँग्रेसपासून दूर राहण्याची भूमिका घेतली.

पाटणा : जन सुराज पार्टीचे संस्थापक आणि बांकीपूरचे आमदार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी वंदे मातरमवरुन सुरु असलेल्या वादावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काँग्रेस मुख्यालयात काँग्रेस (Congress) नेत्यांकडून वंदे मातरमचा( Vande Mataram) अपमान झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता प्रशांत किशोर यांनी म्हटलं की भाजप स्वत:ला जगातील सर्वात मोठी पार्टी म्हणवते आणि काँग्रेस देशातील सर्वात जुना पक्ष आहे. आता भाजपनं आरोप केलाय तर काँग्रेस त्याचं उत्तर द्यायला सक्षम आहे, आम्ही लोकांनी यावर काय बोलायचं असा सवाल प्रशांत किशोर यांनी म्हटलं.
खरंच काँग्रेसच्या लोकांनी चूक केली असेल तर...
प्रशांत किशोर म्हणाले की, आम्ही जो व्हिडिओ पाहिला त्यात वंदे मातरम पूर्ण पाहिलं आहे. आता मध्ये कोण थांबवत होतं आणि कोण थांबवत नव्हतं , हे सरकारला माहिती आसेल, त्यांनीच शोध घेतला पाहिजे. खरंज जर काँग्रेसच्या नेत्यांनी चूक केली असेल तर आता सरकारनं त्याबाबत कायदा केला आहे. तुम्ही जर त्याचा अपमान केला असेल तर तुमच्यावर केस होईल. भाषणबाजी करण्याऐवजी भाजपनं सोनिया गांधी यांच्यावर केस केली पाहिजे, असं प्रशांत किशोर म्हणाले.
#WATCH पटना, बिहार। वंदे मातरम विवाद पर जनसुराज पार्टी के संस्थापक और विधायक प्रशांत किशोर ने कहा, "भाजपा खुद को दुनिया की सबसे बड़ी पार्टी कहती है और कांग्रेस इस देश की सबसे पुरानी पार्टी है। अब भाजपा ने आरोप लगाया है और कांग्रेस इसका जवाब देने में सक्षम हैं। इस पर हम लोगों को… pic.twitter.com/6Rsk1gGw67
— ANI_HindiNews (@AHindinews) August 16, 2026
मनोज तिवारींना प्रत्युत्तर
मनोज तिवारी यांनी प्रशांत किशोर यांना अहंकारी म्हटलं होतं. आता प्रशांत किशोर यांनी त्यांना मनोज तिवारी यांच्याकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. मनोज तिवारी यांना पुन्हा सांगेन की ते वास्तवात गाणं म्हणणारे व्यक्ती आहेत. भाजपच्या मदतीनं ज्या मतदारसंघाचे खासदार आहेत, तिथं काम करावं, असं प्रशांत किशोर म्हणाले. बिहारमध्ये विनाकारण राजकारण करु नये, बिहारच्या लोकांनी तुम्हाला स्वीकारलं नाही आणि ते स्वीकारणार देखील नाहीत, असं प्रशांत किशोर म्हणाले.
भाजपकडून आंदोलनं
भाजपनं वंदे मातरमच्या मुद्यावरुन देशभरात विविध राज्यांमध्ये आंदोलनं केलं, काही ठिकाणी कँडल मार्च काढण्यात आला. गुजरातच्या वडोदरापासून उत्तर प्रदेशच्या लखनौ, राजस्थानच्या जयपूरसह रायपूरसह इतर राज्यांमध्ये भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी वंदे मातरमच्या मुद्यावरुन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शनं केलं.
Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी























