Namdev Shashti Dhananjay Munde | मुंडेंची शास्त्रींकडून पाठराखण, वादाचा पाठलाग Special Report
वाल्मिक कराडवरून चक्रव्युहात अडकलेल्या धनंजय मुंडेंच्या बचावासाठी धावून आले, भगवानगडचे नामदेव शास्त्री...मात्र आता मुंडेंसोबत नामदेव शास्त्रीदेखील विरोधकांच्या टीकेच्या निशाण्यावर आलेत. विशेषतः देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींबाबत शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यांवरून वाद उफाळलाय...आरोपींबद्दलची शास्त्रींची भाषा दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या जिव्हारी लागलीय... सत्ताधारी आणि विरोधक दोघंही शास्त्रींवर टीका करत असले तरी दोघांची भाषा मात्र वेगवेगळी असल्याचं चित्र आहे. पाहूया, याविषयीचा सविस्तर रिपोर्ट.
हे देखील वाचा
Union Budget 2025 : किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळतं? कर्जाचे 5 लाख कुठे खर्च करता येतात?
Union Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात विकसित भारताची संकल्पना मांडली. या अर्थसंकल्पात त्यांनी शेती क्षेत्रासाठी नवीन घोषणा केल्या आहेत. यामधील महत्वाची घोषणा म्हणजे किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपये करण्यात आली आहे.
केसीसीसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात
आतापर्यंत शेतकऱ्यांना शेतीसाठी किसान क्रेडिट कार्डवर फक्त 3 लाख रुपयांची मर्यादा मिळत होती. याशिवाय देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही देशाच्या सुस्त आर्थिक विकासाला गती देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. या वाढीव मर्यादेचा लाभ लवकरच शेतकऱ्यांना मिळेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. केसीसीसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात. यामध्ये स्वत:च्या मालकीची जमीन असणारे, इतरांची जमीन भाडेतत्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो.
KCC कर्जाचे पैसे कुठे खर्च करू शकता?
किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना अत्यंत स्वस्त व्याजदरात कर्ज दिले जाते. हे कर्ज शेतकऱ्यांना शेतीसाठी दिले जाते. अशा परिस्थितीत शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके आणि डीएपी शेतीसाठी खरेदी करण्यासाठी KCC मर्यादेचा वापर करू शकतात. देशात लहान शेतकरी मोठ्या संख्येने आहेत, ज्यामुळे त्यांच्याकडे शेतीसाठी पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केसीसी योजना सुरू केली होती.
All Shows

































