Mahayuti Politics : निवडणुकांची वाट, भरतीची लाट? महायुतीत अंतर्गत वाद? Special Report
मविआमधील नेते आपल्या पक्षात घेण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षात चढाओढ सुरु आहे. आपल्याच उमेदवाराला विरोध केलेल्या, विधानसभेत मविआकडून लढलेल्या, हरलेल्या नेत्यांना पक्षात घेतल्यानं महायुतीचं संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. मेगाभरतीमध्ये आयात केलेल्या अशा नेत्यांना योग्य न्याय देण्याच्या नादात आपल्या पक्षावर अन्याय होणार नाही ही कसरत सुद्धा साधायची आहे. आणि हेच महायुतीत वादाचं कारण बनू शकते. पाहूयात याबाबतचा एक रिपोर्ट
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. याला कारण ठरणार आहे महायुतीत सुरु असलेली नेते-आयातीची लगबग. माजी आमदार, माजी महापौर, जिल्हा परिषद- पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नेत्यांना आपापल्या पक्षात घेण्यासाठी मेगाभरती सुरूआहे. त्या चर्चेतलं एक नाव म्हणजे नाशिकचे सुधाकर बडगुजर. ठाकरेंच्या सेनेचे उपनेते असलेले बडगुजर नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले.
ठाकरेंचे खासदार आणि बडगुजर यांचे नेते संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच सुधाकर बडगुजर मुख्यमंत्र्यांना भेटले हे विशेष. मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा याकडेच लक्ष वेधत राऊतांवर निशाणा साधला.
बडगुजर यांच्याप्रमाणेच गावोगावी अस्वस्थ नेते गळाला लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. नुकतेच महायुतीत आलेल्या नेत्यांमुळे होणारा तणाव, वाद कमी करण्याचं आव्हान सुद्धा महायुतीसमोर आहे.
सध्या ही जरी प्राथमिक उदाहरण दिसत असली तरी आगामी काळात अनेक दिग्गज महायुतीत येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे महायुती म्हणून जर शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप आगामी निवडणुकीला सामोरे जाणार असतील तर , स्थानिक समीकरणं सांभाळण्याचं आव्हान महायुतीसमोर असणार आहे. संभाव्य वाद वेळीच मिटवले नाहीत तर त्याचा थेट फायदा महाविकास आघाडी उचलू शकेल,
All Shows

































