Vidhan Sabha : खेळ आकड्यांचा, प्रश्न जागावाटपाचा; महायुती मविआची जागावाटपाची चाचपणी Special Report
लोकसभेच्या रणसंग्रामानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेयत... आणि त्यासाठी सर्वच पक्षांच्या जोर-बैठका आणि दावे-प्रतिदावे सुरू झालेयत... पाहूयात... २८८ जागांपैकी कुणाला किती जागा लढवायच्या आहेत? आणि त्यामागचे रणनीती काय आहे? हे सांगणार स्पेशल रिपोर्ट...
विधानसभा निवडणुकीचे पडघम आता
वाजायला सुरूवात झालीय... त्यामुळे
महायुती असो की महाविकास आघाडी... या
दोन्हीतील सर्वच्या सर्व पक्षांनी निवडणुकीची
जोरदार तयारी सुरू झालीय... आणि त्यासाठी
कळीचा मुद्दा ठरलाय तो जागावाटपाचा...
लोकसभा निवडणुकीतील निकालाचे आकडे
पाहूनच, हे सर्व पक्ष जागांसाठी हट्ट धरताना
पाहायला मिळतायत... मुख्यमंत्री एकनाथ
शिंदेंच्या गटाने १०० जागांचा आग्रह महायुतीकडे
धरल्याचं बोललं जातंय.
महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या
भाजपच्या नेत्यांनी मात्र १७० ते १८० जागा
लढवाव्यात असा अग्रह धरलाय...
तर तिकडे अजित पवार गट ८५ जागा
लढवण्याची तयारी करत असल्याचं समजतंय...
२०१९ साली निवडणुकीत ५४ आमदार निवडून
आले होते, त्यामुळे ५४ प्लस म्हणजेच ८५ जागा
लढण्याची इच्छा अजित पवार गटाची आहे...
हे तर झालं महायुतीचं... मात्र महाविकास
आघाडीतील पक्षांमध्ये जागांसाठीची चढाओढ
जोरदार सुरू झालीय... कारण काँग्रेसकडून
१०० जागा लढवण्याची चाचपणी सुरू झाल्याचं
समजतंय...
लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळाल्याने
ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुनावलाय... म्हणूनच
ठाकरे गट विधानसभेच्या १३० जागांसाठी
हट्ट धरून बसल्याचं बोललं जातंय.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने
आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास
आघाडीत आपल्याला शंभर जागा मिळाव्यात
अशा पद्धतीची भूमिका घेतल्याची चर्चाय..
महायुती असो की महाविकास आघाडी...
यातील सर्वच पक्षांना निवडणुकीच्या बोहल्यावर
चढण्याआधी जागावाटपाच्या मांडवाखालून
जावं लागणार आहे... त्यामुळे, यावरून
रुसवे फुगवे किती होणार, हे काही दिवसांतच
पाहायला मिळणारेय...
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा
All Shows

































