Iran Hijab Special Report : इस्लामिक क्रांती आणि इराणची दुरोगती; का मागे पडला इतका मोठा देश?
इजरायलसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एकेकाळी मध्य आशियातील “पोलीस” म्हणून ओळखला जाणारा इराण आज अंतर्गत असंतोष, महिलांच्या आंदोलन आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे अडचणीत आहे.
1979 मध्ये इस्लामी क्रांतीनंतर इराणमधील राजेशाही संपुष्टात आली आणि देश इस्लामिक प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला. आयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली शरिया कायदा लागू झाला. महिलांसाठी हिजाब सक्तीची झाली, आणि अनेक धार्मिक बंधनं लागू झाली. या बदलांमुळे देशात कट्टरवाद वाढला, तर स्वातंत्र्यांची गळचेपी झाली.
2022 मध्ये महसा अमिनीच्या मृत्यूनंतर महिलांनी आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात सरकारविरोधात आंदोलन केलं. हिजाब सक्ती, बेरोजगारी, आणि धार्मिक दडपशाहीविरोधात उभं राहणाऱ्या या चळवळीने जगाचे लक्ष वेधून घेतले.
आज इराणचा अणुउर्जेचा कार्यक्रम आणि पश्चिमविरोधी धोरण पुन्हा एकदा जागतिक चर्चेचा विषय ठरत आहे. तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देश आणि संस्था इराणमधील लोकशाही आणि महिला हक्कांच्या समर्थनासाठी आशावादी आहेत.
All Shows

































