एक्स्प्लोर

Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report

दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ... अमेरिका-इस्रायल-इराण युद्धात आता या म्हणीची प्रचिती येऊ लागलीये... एवढे दिवस युद्धाची लांबून गम्मत बघणाऱ्या चीन आणि रशियाचा आता यातला छुपा सहभाग समोर येऊ लागलाय... आखाती देश युद्धात गुंतले असताना त्यातून स्वतःचा कसा फायदा होईल आणि अमेरिकेचं जास्तीत जास्त नुकसान कसं करता येईल, या खटपटीत चीन आहे... बघुयात आंतरराष्ट्रीय राजकारणात घडणाऱ्या घडामोडींवर हा स्पेशल रिपोर्ट...

<<इराण युद्ध, होर्मुझ, ट्रम्प, क्षी जिनपिंग यांच्या कट अवेजचा मोंटाज करा... >>

इराण-अमेरिका युद्धामुळे सगळं जग चिंताक्रांत असताना एक देश आहे, की जो यातून स्वतःचा फायदा शोधतोय... 

जागतिक व्यापारात अमेरिकेचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि सीमेवर भारताच्या खोड्या काढणारा चीन... 

अमेरिका-इस्रायलनं इराणवर हल्ला केला अन् तब्बल ४० दिवस इराण त्यांच्या बलाढ्य सैन्याला पुरून उरला... 

अमेरिकेनं पाडलेल्या इमारती, पूल, वीजकेंद्रं पुन्हा उभे करता येतील... 

पण ट्रम्प यांचा अहंकार वेळीच ठेचणं आवश्यक आहे, असं मानणाऱ्या इराणी राज्यकर्त्यांच्या पाशीठी जनता उभी राहिली... 

त्यामुळे सर्वोच्च नेतृत्व मारलं जाऊनही त्यांच्या जागी आलेल्यांना इराणमधून अंतर्गत ऊर्जा मिळाली....

पण तेवढं पुरेसं नव्हतं, तर बाहेरूनही अमेरिकेचं नाक ठेचण्यासाठी मदत इराणला हवी होती... 

आणि अशा वेळी हात पुढे केला तो अमेरिकेचे कट्टर प्रतिस्पर्धी चीन आणि रशियानं... 

GFX IN 

युद्धाला तोंड फुटण्याच्या आधीपासूनच चीन आणि रशियाकडून इराणला मदत केली जात असल्याचं सांगितलं जातंय.. 

इराणसोबत आधीपासून अस्तित्वात असलेल्या व्यापार मार्गांवरून ड्रोन तसंच रॉकेटचं इंधन या दोन्ही देशांतून पाठवलं जातं... 

आखाती देशांमध्ये अमेरिकेच्या तळांची लोकेशन्स रशियाच्या लष्करी गुप्तहेरांनी इराणला पुरवल्याचं मानलं जातंय... 

होर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय लष्करी दलाचा वापर करावा, असा प्रस्ताव बहारीननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडला होता... 

मात्र रशिया आणि चीन यांनी आपला नकाराधिकार वापरून हा प्रस्ताव हाणून पाडला... 

GFX OUT 

शस्त्रसंधी झाल्यानंतर चीन इराणला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं पाठवणार असल्याचं वृत्त अमेरिकी माध्यमांनी दिलं... 

त्यानंतर ट्रम्प यांनी चीननं हत्यारं पुरवली, तर त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता... 

बाईट -- डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
((etxm Trump On China trans loop byte 120426 DB))

त्यावर जागतिक अशांतीला अमेरिकाच जबाबदार आहे, असा पलटवार करत चीनचे संरक्षणमंत्री डोंग जुन यांनी हा आरोप फेटाळला... 

मात्र आपली धमकी दुसऱ्याच दिवशी खरी करून दाखवत ट्रम्प यांनी चिनी मालावर वाढीव आयातशुल्क लादलंय... 

GFX IN 

ट्रम्प यांनी चिनमधून आयात होणाऱ्या मोटारींवर १०० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केलीये... 

चीनमध्ये स्वस्तात तयार होणाऱ्या कारमुळे युरोपातल्या मर्सिडीझ, बीएमडब्ल्यूसारख्या कंपन्यांचा व्यवसाय हिरावला जातोय... 

तर अमेरिकेतही जनरल मोटर्स, फोर्ड या कंपन्या चिनी कारमुळे देशोधडीला लागतील, असा आरोप ट्रम्प यांनी केला... 

GFX OUT 

चिनी मोटारींवर टॅरिफ लावण्यासाठी ट्रम्प यांनी इराण युद्धाचं कारण दिलं नसलं, तरी या निर्णयाच्या 'टायमिंग'वर अनेकांनी शंका उपस्थित केलीये... 

एकीकडे इराणला छुपी मदत करताना अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना एकेक करून तोडण्याचा पद्धतशीर कार्यक्रमही चीननं हाती घेतलाय... 

मिड पीटीसी
((अलिकडेच अबु धाबीचे युवराज मोहम्मद बिन झायद यांनी चीनचा दौरा केला... इराणच्या हल्ल्यांना उत्तर देण्यात अमेरिकेची यंत्रणा कमी पडत असल्याची अरब राष्ट्रांची भावना झालीये. इराण युद्धाला पहिल्यापासून विरोध करणारे स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सान्चेझ यांनीही चीनचा दौरा करून संबंध सुधारण्याचा प्रयत्न सुरू केलाय... तिकडे अमेरिकेचा शेजारी असलेल्या कॅनडानं अमेरिकन कंपन्यांकडून शस्त्रास्त्रं खरेदी करणार नसल्याचं जाहीर केलंय... बिछडे चले सभी बारी बारी, अशी अमेरिकेची अवस्था झालीये... तर चल चल चल मेेरे साथी, असं गाणं अनेक जण आता चीनसाठी गाऊ लागलेत...))

इराण युद्धाचा चीन अशा पद्धतीनं स्वतःसाठी वापर करत असताना रशियादेखील मागे नाही... 

होर्मुझचा मार्ग बंद झाल्यामुळे अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंध शिथिल केले... 

यातून कोट्यवधी डॉलरचा नफा कमावण्याची संधी रशियाला मिळाली... 

आता पाकिस्तानची मध्यस्थी फसल्यानंतर इराण-अमेरिकेत समेट घडवून आणण्याची तयारी रशियानं दाखवलीये.... 

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्याशी फोनवर चर्चा केली... 

विशेष म्हणजे, अमेरिकेच्या मागणीनुसार इराणकडचा ६० टक्के समृद्ध केलेला युरेनियम खरेदी करण्याची तयारीही रशियानं दाखवलीये... 

चीन आणि रशियाचे हे प्रयत्न म्हणजे जागतिक मंदीत संधी शोधण्याचाच प्रकार आहे... 

ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget