बचावपथक तात्काळ का पोहोचलं नाही? तळीयेत संपूर्ण कुटुंब गमावलं,भारतीय सैन्य दलातील जवानाचा सवाल
रायगडमधील तळीये गावात दरड कोसळून 42 नागरिकांचा मृत्यू झाल्या. येथील अनेक घरं दरडीखाली गाडले गेले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत घोषणा केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या सहमतीनं हा निर्णय घेतल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं की, "कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला की कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती."
All Shows




























