Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
निवडणुका जाहीर झाल्या आहेत... तिकिटासाठी नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावलीय... तर ज्यांना तिकिटं मिळाली आहेत, त्यांनी मात्र अर्ज दाखल करण्यासाठी वेगळाच मुहूर्त शोधलाय... २२ ते २९ ऑक्टोबरदरम्यान अर्ज भरण्याची मुदत आहे... मात्र, शुभ दिवस साधण्यासाठी नेत्यांची लगबग उडालीय... पाहूयात...
कोण कधी भरणार अर्ज?
एकनाथ शिंदे २४ ऑक्टोबरला अर्ज भरणार
आदित्य ठाकरे, छगन भुजबळ २४ ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार
२४ ऑक्टोबरला बावनकुळे, चंद्रकांत पाटील, भातखळकरांचा अर्ज
राजन साळवी, वैभव नाईक २४ ऑक्टोबरला अर्ज भरणार
दिलीप वळसेही २४ ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार
फडणवीस, मुनगंटीवार महाजन, मनिषा चौधरी २८ ऑक्टोबरला अर्ज भरणार
तर
अजित पवारांची अर्ज भरण्यासाठी २८ ऑक्टोबरला पसंती
अर्ज भरण्यासाठीची मुदत आजपासून सुरू
झालीय, पण उमेदवारांनी अर्ज तर घेतलेत...
पण अर्ज भरण्यासाठी मात्र बहुतांश
उमेदवारांनी अर्ज भरण्याकडे पाठ
फिरवल्याचं दिसलं... आधी तिकिटं
मिळवण्याची कसरत... त्यानंतर मतदारांशी
संपर्क... कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी... एवढं
सगळं करून नेतेमंडळी मुहूर्ताची शोधाशोध
करतायत... मात्र, ज्योतिषांना हात
दाखवणाऱ्या नेत्यांचं भविष्य मतदारांच्याच
हातात असणारेय...