Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाआधीच विरोधाची तुतारी Special Report
भाजपचे हर्षवर्धन पाटील कमळ सोडून राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्यायत... मात्र इंदापूरमधील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना उमेदवारी देण्यास विरोध केलाय... त्यांनी ही भूमिका थेट शगद पवार यांच्यासमोर मांडलीय... त्यावेळी शरद पवारांनी सूचक वक्तव्य केलंय... पाहूयात, १० वर्ष विधिमंडळापासून दूर राहिलेल्या हर्षवर्धन पाटलांची ही अस्तित्वाची लढाई कशी आहे आणि त्यांना होणारा विरोध याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट...
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाआधीच विरोधाची तुतारी
'पाटलांना प्रवेश द्या, मात्र उमेदवारी नको'
इंदापुरातील इच्छुकांची शरद पवारांसमोर भूमिका
पाटील अस्तित्वाची लढाई कशी लढणार?
शरद पवार इंदापूरबाबत काय निर्णय घेणार?
आता शरद पवार हर्षवर्धन पाटलांच्या हातात तुतारी देणार की
पक्षातील कार्यकर्त्यांच्या आग्रहाला मानाचं पान देणार?
आणि जर पवारांनी हर्षवर्धन यांच्या हातात तुतारी दिली तर पक्षातील कार्यकर्ते त्यांच्यासाठी मनापासून काम करणार का?
तसंच पवारांनी हर्षवर्धन पाटलांना संधी दिली नाही तर त्यांची पुढची राजकीय चाल काय असणार?
या सगळ्या प्रश्नांनी इंदापूरची लढत दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चाललीय..
आगे आगे देखिये होता है क्या..