Mehul Choksi : मिशन मेहुल चोक्सी... भारतात आणण्यासाठी डॉमिनिकाच्या कोर्टात ईडी याचिका दाखल करणार
मेहुल चोक्सीला एका दिवसापूर्वी पोलिसांच्या सेलमधून डोमेनिकाच्या पोर्ट्समाउथमधील सरकारी क्वॉरंटाईन सेंटरमध्ये दाखल केलं होतं. चोक्सीच्या वकीलांचा दावा आहे की, मेहुल चोक्सीचं अपहरण करुन त्याला अँटिगुआहून डोमेनिकाला आणलं होतं. त्या दरम्यान, त्याच्यासोबत मारहाण करण्यात आली होती. अटक झाल्यानंतरचा पहिला फोटो हाती लागला आहे. चोक्सीचा हा फोटो डोमिनिकातील तुरुंगातील असल्याचं समोर आलं होतं. मेहुल चोक्सीच्या शरीरावर जखमांच्या खुणा असल्याचं या फोटोंमध्ये दिसलं होतं. तसेच या फोटोमध्ये या फोटोत चोक्सीचा एक डोळा खूप लाल दिसून येत होता. दरम्यान, या प्रकरणात मेहुलचे वकील आणि सरकारला 1 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर 2 जून रोजी या प्रकरणी खुल्या न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
All Shows

































