एक्स्प्लोर

Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report

इराणला पराभूत करता न आल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तोल सुटत चालल्याचं दिसतंय... साधं युद्धातल्या नुकसानीबद्दल जरी कुणी बोललं, तरी ते त्यांना खपत नाही आणि ते लगेच शेलक्या शब्दांत टीका सुरू करतात... समोरचा माणूस किती अनुभवी आहे, त्याची एकूण जगात पत काय याचा कसलाच विचार ट्रम्प महाशय करत नाहीत... आता पुन्हा तेच झालंय... केवळ लेबनॉनमधल्या युद्धग्रस्तांबद्दल सहवेदना व्यक्त केल्यावर ट्रम्प चक्क पोप लिओ यांच्यावर बरसले, अन् तेदेखील अत्यंत आक्षेपार्ह भाषेत... 

आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ...

अमेरिका-इराण वाटाघाटी फसण्याचं एक कारण आहे इस्रायलचे लेबनॉनवरील हल्ले...

मुळातच शस्त्रसंधीच्या मसुद्यात हा मुद्दा होता की नव्हता, यावरून दोन्ही बाजुंमध्ये वाद होता...

त्यातच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हल्ले थांबणार नसल्याची धमकी दिली आणि ती खरी करून दाखवली...

(
इराण युद्धाला आधीपासूनच विरोध असलेल्या व्हॅटिकनमधून आता लेबनॉनच्या युद्धग्रस्त नागरिकांबाबत सहवेदना व्यक्त होतेय...

स्वतः पोप लिओ यांनी ट्रम्प आणि नेतान्याहू यांना मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला...

दुःख, भय आणि में परमेश्वराकडून असीम अपेक्षा बाळगण्याच्या या काळात... लेबनॉनचे प्रिय नागरिक अधिक जवळ आल्याचं मी अनुभवतोय. मानवतेचा हाच धर्म आहे.))

युद्धखोरीवर कुणी टीका केली, की ट्रम्प यांच्यासाठी तो लगेच व्हिलन होतो...

याला सर्वोच्च कॅथोलिक धर्मगुरूंचा अपवादही ट्रम्प करत नाहीत...

युद्ध थांबवण्याचा सल्ला देणाऱ्या पोप लिओ यांच्यावर ट्रम्प यांनी कशी आगपाखड केली, तुम्ही स्वतःच ऐका...

आणि आपण स्वतः सोडून प्रत्येकाला तुच्छ समजणारी त्यांची बॉडी लँग्वेजही बघा...

मला नाही वाटत की ते चांगलं काम करतायत. त्यांना गुन्हे आवडतात, असं मला वाटतं.

कुणाकडे अण्वस्त्र असतील, तर चालेल असं म्हणणारे पोप आम्हाला आवडत नाहीत. तुमच्या शहरात गुन्हेगारी असेल, तरी चालेल असं म्हणणारे पोप आम्हाला नकोत. मी पोप लिओ यांचा चाहता नाहीये.

अण्वस्त्रं बाळगण्याची आणि जग उडवून द्यायची इच्छा असलेल्या देशासोबत आम्ही खेळू नये, असं वाटणारा हा माणूस आहे... मी पोप लिओ यांचा चाहता नाहीये.))

रॉयटर्सला दिलेल्या प्रतिक्रियेत ट्रम्प यांच्याशी वाद घालण्याची अजिबात इच्छा नसल्याचं पोप लिओ यांनी स्पष्टपणे सांगितलं...

धर्मग्रंथांमधील शिकवणीचा अशा पद्धतीनं दुरुपयोग केला जाऊ नये... तसा प्रकार काही जण करत आहेत...

युद्धविरोधात जोरात आवाज उठवतच राहणार... जागतिक शांतता, चर्चेतून तोडगा आणि चांगले द्वीराष्ट्रीय संबंध असावेत हा आपला उद्देश असल्याचंही पोप लिओ म्हणाले.

अमेरिकेतल्या सुमारे ७ कोटी अन् जगभरातल्या १४० कोटी कॅथोलिक ख्रिश्चनांच्या सर्वोच्च धर्मगुरूंबद्दल एक राष्ट्राध्यक्ष वापरत असलेली ही भाषा...

बरं... पोप हे केवळ ख्रिश्चन धर्मगुरूच नाहीयेत, तर जगातल्या सर्वात छोट्या देशाचे, व्हॅटिकन सिटीचे ते राजेही आहेत...

पण स्वतःच्याच प्रेमात असलेल्या आणि इराणनं पछाडलेल्या ट्रम्प यांना एवढं भान कुठलं?

आता ट्रम्प स्वतःला येशू ख्रिस्त मानत असतील, तर गोष्ट वेगळी...

विश्वास नाही बसत? मग त्यांनी ट्रुथ सोशलवर स्वतः अपलोड केलेला हा फोटो बघा...

पोप लिओवर टिकेची झोड उठवल्यानंतर काही तासांतच त्यांच्या वॉलवर हा फोटो झळकला...

यात थेट येशू खिस्ताप्रमाणे एका आजारी माणसाला ट्रम्प हाताच्या स्पर्शानं बरा करत असल्याचं दिसतंय...

दुसऱ्या हातातून त्यांच्या दैवत्वाची साक्ष देणारा प्रखर प्रकाश बाहेर पडतोय...

आजुबाजुला सैनिक, नर्स, सामान्य नागरिक हात जोडून ट्रम्प यांच्या या चमत्काराकडे बघतायत...

मागे अमेरिकेचा झेंडा, उडाणारी लढावू विमानं आणि 'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' आहे...

हा प्रकार बघितल्यावर या माणसाला नेमकं का निवडून दिलं, हा प्रश्न अमेरिकेच्या जनतेला पडला असेल...

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget