Darshana Pawar : दर्शनाची हत्या कुणी केली?हत्या राहुलनेच केली का?कोण आहे राहुल हंडोरे?Special Report
गेल्या दोन दिवसांपासून दर्शना पवार हे नाव आपण सातत्याने ऐकतोय. कारण दर्शना पवार एमपीएससी परिक्षेत राज्यात तिसरी आली. कित्येक वर्षांच्या अहोरात्र मेहतनीचं फळ तिला या निकालाच्या माध्यमातून मिळालं. अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न पुर्ण झालं. संघर्षाचं चिज झाल्यावर तिच्यावर अभिनंदनाचा आणि सत्काराचा वर्षाव सुरु झाला. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळच होतं... बातम्यांमध्ये दर्शनाचं नाव झळकत असताना अचानक एक अघटित घडलं. दर्शना बेपत्ता झाली. तिथून काही दिवसांनी राजगडाच्या पायथ्याशी एक मृतदेह सापडला. मृतदेहाची ओळख पटल्यावर तो दर्शनाचाच असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे हा अपघात कि घातपात प्रश्न पोलिसांना पडला...याचा धांडोळा घेताना पोलिसांच्या हाती काय लागलंय पाहुयात.....
All Shows

































