Chandrapur Fighter Tiger : दमलेल्या वाघाची कहाणी... हुल्लडबाजांच्या गर्दीमुळे वाघाला वाचवण्यात अडथळे
चंद्रपूरच्या मोखाळा गावात वाघ विहिरीत पडलेल्या वाघाची वनविभागानं अतिशय शिताफीनं सुटका केलीय. वनविभागानं दोरीच्या मदतीनं खाट विहिरीत सोडली आणि खाटेचा आधार घेत वाघानं बाहेर उडी मारली आणि थेट जंगलात धूम ठोकली.वरोरा तालुक्यातील मोखाळा गावातील एका शेतकऱ्याच्या विहिरीत हा वाघ पडला होता. रात्रीच्या सुमारास शिकारीचा पाठलाग करताना वाघ विहिरीत पडला असण्याची शक्यता आहे.
हा वाघ सुमारे 12 तास विहिरीत होता, जीव वाचवण्यासाठी हा वाघ सतत पोहवं लागत होतं. पाण्यात डार्ट मारल्यास वाघ बेशुद्ध होऊन पाण्यात बुडण्याची शक्यता होती. त्यामुळं सर्व विचाराअंती अखेर एक खाट धाडसाने विहिरीत सोडण्यात आली. वाघोबानी खाटेवर विसावा घेतला. एकीकडे लोकांची गर्दी आणि गोंगाट आणि दुसरीकडे वाघ...अशा बिकट परिस्थितीत वनविभागाने अतिशय धैर्याने परिस्थिती हाताळली. अखेर वाघाने विहिरीबाहेर उडी मारली आणि जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
All Shows

































