Chandrahar Patil Join Eknath Shinde Special Report : ठाकरेंचा पैलवान एकनाथ शिंदेंच्या सेनेत जाण्याची शक्यता
Chandrahar Patil Join Eknath Shinde Special Report : ठाकरेंचा पैलवान एकनाथ शिंदेंच्या सेनेत जाण्याची शक्यता
शिवसेना ठाकरे पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ज्या चंद्रहार पाटलांसाठी लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या मैदानात काँग्रेस विरुद्ध उद्धव ठाकरेंनी माण ठोकली होती, तोच महाराष्ट्र केसरी पैलवान आता उद्धव ठाकरेंना आसमान दाखवणार असल्याची चर्चा रंगली आहे. पाहूया. मित्रपक्ष काँग्रेसची परवा न करता एवढा मोठा डाव ज्या पैलवानावर उद्धव ठाकरेंनी लावला तो पैलवान म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा आहे. त्यात मंत्री संजय शिरसाट यांनी तर मुहूर्ताची घोषणा सुद्धा करून टाकली आहे. तुमचे कुंपन साफ झालेले त्याच्याकडे लक्ष मी वारंवार सांगत असतो की इतरांकडे डोकून पाहण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचं काय चाललय ते पाहण. जास्त त्रासदायक असू शकते. शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाची ऑफर आहे हे चंद्रहार पाटलांनी मान्य केलं. मात्र पक्षप्रवेश करायचा, पक्ष सोडायचा याबाबत निर्णय अजून घेतला नाही असं सांगत अधिकृत भूमिका लवकरच जाहीर करू असा पवित्रा त्यांनी घेतलाय. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील नाराज असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे. चंद्रकांत पाटलांनी 26 एप्रिल रोजी उदय सामंतांच्या मध्यस्थीने कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. त्याला जी काही ताकद लागेल त्याची स्वतःची देखील ताकत आहे तो स्वतः पैलवान आहे. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी असा कुठला विचार केला तर नक्की शिवसेना जी आहे त्याचे स्वागत करेल. सांगली लोकसभा निवडणूक हाय वोल्टेज झाली होती. येथे उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली होती हे आपल्याला आठवत असेलच. त्यानंतर काँग्रेसमधून विशाल पाटलांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून लाखभर मतांनी निवडूनही आले. चंद्रहार पाटील तिसरे. क्रमांकावर फेकले गेले होते. या निवडणुकीत ठाकरे विरुद्ध काँग्रेस असा तणाव झाला असला तरी त्याला एक कारण पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील असल्याची ही चर्चा रंगली होती. चंद्रहार पाटील हे काही फार मोठे नेते किंवा फार जुने राजकारणी नाहीत. पण चौदाच महिन्यात त्यांनी ठाकरेंना सोडून जाणं हे ठाकरेंसाठी चांगलं लक्षण नाही.
All Shows

































