Byculla Zoo Penguin Politics : पेंग्विनंचं बारसं, वादाचा पाळणा; मराठी नामांतर होणार? Special Report
मुंबईतली वीरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालय अर्थात राणीच्या बागेलीत पेंग्विन हे इथे येणाऱ्या पर्यटकांचं खास आकर्षण. नुकताच इथे पेंग्विनच्या तीन पिल्लांचा जन्म झाला. मात्र त्यांच्या नामकरणावरुन सध्या वाद पेटलाय. पेंग्विनच्या इंग्रजी नावांबाबत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. नव्याने जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्ल्यांची नावं मराठीत हवी असा भाजपचा आग्रह आहे. यावर प्राणीसंग्रहालय प्रशासनानं कोणता निर्णय घेतलाय? भाजपचं यावर नेमकं काय म्हणणं आहे? पाहूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट...
हे आंदोलन सुरु आहे मुंबईतील वीर जिजामाता उद्यानात अर्थात राणीच्या बागेत.
या बागेत नुकत्याच जन्मलेल्या नव्या तीन पेंग्विनच्या नावांना भाजपकडून आक्षेप घेण्यात आलाय.
या पेंग्विनची इंग्रजी नावं बदलून ती मराठीत ठेवावीत, अशी मागणी करत भायखळ्याचे भाजप आमदार नितीन बनकर यांच्या नेतृत्वाखाली इथं आंदोलन करण्यात आलं.
या वर्षीच्या मार्च महिन्यात राणीच्या बागेत तीन नव्या पेंग्विनचा जन्म झाला.
त्यांची नावं नॉडी, टॉम आणि पिंगू अशी ठेवण्यात आली.
मात्र एकीकडं मराठीला अभिजात दर्जा मिळत असताना प्रशासनाकडून हे इंग्रजीप्रेम का दाखवलं जातंय, असा सवाल करत भाजपकडून राणीच्या बागेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन पेंग्विनच्या पिल्लांचं मराठी बारसं केलं नाही, तर बागच बंद करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय.
पेंग्विनच्या पिल्लांची इंग्रजी नावं
२०२१ मध्ये एका पिलाचा जन्म झाला.
त्याचं नाव ओरेओ असं ठेवण्यात आलं.
२०२२ मध्ये तीन पिलांचा जन्म झाला.
त्यांची नावं फ्लॅश, बिंगो आणि ऍलेक्सा अशी ठेवण्यात आली.
२०२३ मध्ये तीन पिलांना जन्म झाला.
त्यांची नावं कोको आणि स्टेला अशी आहेत.
तर २०२५ मध्ये तीन पिलांचा जन्म झाला.
त्यांची नावं नॉडी, टॉम आणि पिंगू अशी ठेवण्यात आली.
All Shows

































