Baluchistan Special Report : फुटणार पाकिस्तान? जन्मणार बलुचिस्तान? माझाचा स्पेशल रिपोर्ट
Baluchistan Special Report : फुटणार पाकिस्तान? जन्मणार बलुचिस्तान? माझाचा स्पेशल रिपोर्ट
संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेले जगात एकूण १९३ देश आहेत. या देशांच्या यादीत आता आणखी एका देशाचा समावेश होण्याचा समावेश आहे. त्याचं नाव आहे बलुचिस्तान. बलुचिस्तान हा सध्याच्या पाकिस्तानमधला एक महत्वाचा आणि मोठा प्रांत आहे. पण गेली अनेक दशकं बलुचिस्तानचा स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरु आहे. मात्र पाकिस्तान बंदुकीच्या जोरावर बलुचिस्तानवर दबाव राखून आहे. मात्र भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर बलुचिस्तानचा स्वातंत्र्याचा लढा तीव्र झालाय. या स्वातंत्र्यलढ्यात आघाडीवर असलेली बलुच आर्मी सक्रिय झाली आहे... तिथे नेमकं काय घडतंय? कसं आहे बलुचिस्तान? या बलुचिस्तानचं भारताशी नेमकं काय कनेक्शन आहे?
हे ही वाचा..
बलोच नेता मीर यार बलोचनं बलुचिस्तानला स्वतंत्र घोषितही करुन टाकलं... नव्या देशाचा झेंडाही जारी केला... आणि संयुक्त राष्ट्रसंघाकडे स्वतंत्र बलुचिस्तानला मान्यता देण्याची विनंती केलीये.... इतकंच नव्हे तर भारत सरकारलाही नवी दिल्लीत बलुचिस्तान उच्चायुक्तालय सुरु करण्यासाठी परवानगी मागितली असल्याची माहिती आहे... आणि जर हे सगळं खरं झालं तर ५४ वर्षांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे दोन तुकडे होणार आहेत... आणि पाकिस्तानचा भूगोल बदलणार आहे....
All Shows

































