Top 100 Headlines : दिवसभरातील शंबर बातम्या एका क्लिकवर : 24 September 2024 : ABP Majha
बदलापूर नराधमाच्या एन्काऊंटरनंतर देवाचान्याय हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये, भाजप नेत्याकडूनही उल्लेख, तर दिघे स्टाईलनं न्याय झाल्याची शिंदेंच्या नेत्याची प्रतिक्रिया
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीचं पथक मुंब्रा पोलीस ठाण्यात...घटनास्थळाची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी...अक्षयचं पोस्टमॉर्टम पूर्ण...
एन्काऊंटर करून कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल...महाराष्ट्राची जनता येत्या निवडणुकीत दुसऱ्या शिंदेंचा राजकीय एन्काऊंटर करेल, राऊतांचा घणाघात...
अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला पण एन्काऊंटर विरोधकांचा झाला, आशिष शेलारांचा पलटवार...पवार, ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हल्लाबोल...
उपोषणाच्या आठव्या दिवशी मनोज जरांगेची प्रकृती खालावली.. उपाचार घेण्य़ाची विनंती करताना आंदोलक महिलांना अश्रू अनावर...
जालन्याच्या वडीगोद्रीत मराठा आंदोलक पुन्हा रस्त्यावर, परभणीतून येणाऱ्या मराठा बांधवांना व़डीगोद्रीतून प्रवेश नाकारल्यानं तणाव...
भाजप विधानसभेची निवडणूक सामूहिक नेतृत्वात लढवण्याच्या तयारीत...कार्यकर्त्यांना वाटलेल्या पत्रकात गडकरी, फडणवीस, बावनकुळेंच्या नावांचा समावेश...
मराठवाडा आणि विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा नागपुरात संवाद...तर निवडणुकीच्या प्रचारासाठी नितीन गडकरी मात्र जम्मू-काश्मीरमध्ये...
पवारसाहेब आमचे दैवत...पण आम्ही कुणाला दुखावलं नाही, करमाळ्यातल्या सभेत अजित पवारांचं वक्तव्य...