TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा: Maharashtra News : 07 June 2024
धाराशिवमध्ये पावसाच्या हलक्या सरी. उन्हाच्या कडाक्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. धाराशिवसह, तुळजापूर, कळंब, वाशी तालुक्यात पाऊस.
यवतमाळच्या वडगाव जंगल परिसरात वादळी पाऊस, वादळामुळे पोलीस ठाण्याच्या इमारतीवरील छप्पर उडाले, इमारतीत पाणी साचून पोलीस ठाण्याचे नुकसान.
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील न्य़ायडोंगरी येथे वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण. मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल. प्राथमिक आरोग्य केंद्रात पिण्याचे पाणी नाही या कारणावरून वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण.
नाशिक शहरातील दहिपुल येथील अभिनव भारत स्मारक वादात. स्मारकाच्या जीर्णोद्धाराचं काम थांबलं. स्थानिक रहिवाशांची प्रशासनाविरोधात ओरड. स्मारक बांधण्यासाठी बेघर करू नका, नागरिकांची मागणी. जीर्णोद्धाराचं काम अर्ध्यावर थांबलं.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर ठाकरे गटाकडून धाराशिवमधे बॅनरबाजी. ठाकरेंचे निष्ठावंत आमदार कैलास पाटील यांचा किंगमेकर म्हणून उल्लेख. कैलास पाटलांच्या बॅनरची जिल्ह्यात एकच चर्चा.
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील भाविक रवी नारायण करगळ यांच्याकडून शिर्डीतील साईंच्या चरणी 3 हजार 25 किलो केसर आंबा दान. त्यामुळे भक्तांना भोेजनात आमरसाची मेजवानी.