Saat Barachya Batmya : 7/12 : Washim : खरीप पिकाला मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव : ABP Majha
गेल्या महिन्याभरात पावसाने ओढ दिल्यानंतर उशिरा का होईना पाऊस बरसला, त्यामुळे कोमलणाऱ्या पिकाला नव संजीवनी मिळाली, पिकाला जीवनदान मिळालं. मात्र गेल्या चार-पाच दिवसापासून ढगाळ वातावरण जास्त आणि पाऊस कमी असल्याने खरिपाच्या पिकावर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे रासायनिक फवारणीचा आधार घेऊन या कीड अळीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न शेतकऱ्यांचे सुरू आहेत.... सध्या सोयाबीन पीक शेंग भरण्याच्या अवस्थेत आहे, त्यामुळे शेंग पोखरणारी अळी आणि शेंडअळी याचा मोठा प्रमाणात शिरकाव झालाय.. तर कुठे पानकत्री अळीनेही मोठ्या प्रमाणात आक्रमण केल्याचे चित्र आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांनी रासायनिक फवारणीचा आधार घेत आपलं पिक वाचवण्याकरीता सुरुवात केली आहे.
सगळे कार्यक्रम





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
