Saat Barachya Batmya 712 : कृषी विद्यापीठातील घडामोडी माध्यमांपर्यंत पोहोचवा : धनंजय मुंडे
कृषी विद्यापीठातील घडामोडी बाबतची माहिती माध्यमांपर्यंत तातडीने पोहोचवण्याची सक्त सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विद्यापीठांना दिली आहे. राज्यातील हवामान बदल, शेतीतील नवनवीन प्रयोग, संशोधन याबाबतची माहिती नियमीत माध्यमांना देण्याबाबत कृषीमंत्री मुंडे यांनी सूचना केली आहे. कृषी विद्यापीठातील सकारात्मक घडामोडींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्यानं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, कृषी विद्यापीठातील घडामोडीबाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यास विलंब होत आहे. कृषीमंत्री मुंडेंच्या नाराजीनंतर कृषी खात्याकडून परिपत्रक जारी करुन तत्काळ माहिती पोहोचवण्याचे विद्यापीठांना आदेश आले आहेत.
All Shows

































