Singer Shaan on Majha Katta : मंत्रमुग्ध करणारा सुरांचा जादूगार गायक शान 'माझा कट्टा'वर
Singer Shaan on Majha Katta : मंत्रमुग्ध करणारा सुरांचा जादूगार गायक शान 'माझा कट्टा'वरसुरुवातीच्या काळात गायक होऊन एवढं काम करेल असं कधी वाटलं नव्हते असे मत सुरांचा जादूगार प्रसिद्ध पार्श्वगायक शान अर्थात शंतनु मुखर्जी (singer Shaan) यांनी व्यक्त केलं. सुरुवातीला दोन चार हजारांची नोकरी करेल असे वाटायचे. मी टीव्ही केबल विकण्याचेही काम केल्याचे शान यांनी सांगितले. मी गाण्याची सुरुवात मराठी गाण्यापासून केली. सुरुवातीला मी 'माझा बाप्पा' हे गाणं गायल्याचे शान यांनी सांगितले. शान यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी संवाद साधला. या गणेशोत्सवाच्या काळात एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर रोज एका कलाकाराशी संवाद साधला जाणार आहे. माझ्या मनात काही आयडीया येत नाहीत. समोरचा काही बोलला की हो म्हणायचे एवढंचं काम मी करतो असे शान म्हणाले. समोरच्याने जर मला विचारले की तुम्ही हे काम कराल का तर मी काहीही विचार न करता काम करेल असे सांगतो असेही शान म्हणाले. या काळात अनेक गोष्टी केल्या, पण त्याचा मला फायदा झाल्याचे शान यांनी सांगितले. चाँद सी फारिश गाताना समोर मोठं आव्हान होतं, कारण समोर अमिर खान होता. चाँद सी फारिश या गाण्याला फिल्म फेअर अॅवार्ड मिळाला त्यानंतर गायक म्हणून एक टप्पा पार केल्याचा आनंद झाला. पुढे मी काम करत राहिलो, पढे आणखी खुप काही करायचे असल्याचे शान यांनी सांगितले.