Majha Katta: बाळासाहेबांनी काठी घेतली अन् म्हणाले मी दाखवतो युनियनशिवाय कसं काम होतं : बालाजी तांबे
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच्या काही आठवणींनाही बालाजी तांबे यांनी उजाळा दिला. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे अनेकदा आश्रमात आले. त्यांना सर्व आश्रम त्यांना फिरुन दाखवला. औषधांची निर्मिती कशी होते याची माहिती देखील दिली. बाळासाहेब ठाकरे सुरुवातीपासून आश्रमात येत होते. एका तंबूत आम्ही जेवल्याचीही आठवण आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोन्ही मोठे राजकीय व्यक्तिमत्व. मात्र दोघे एकत्र ज्यावेळी आश्रमात आले होते, तेव्हा मोठी बातमी झाली होती. एका पेपरने तर असं छापलं होतं की, "बालाजी तांबेंनी आश्रमाभोवती एवढं जंगल वाढवून ठेवलं आहे की आत काय होतं, हे काहीच कळत नाही," अशा आठवणी त्यांनी आज कट्ट्यावर सांगितल्या.
All Shows
































