(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Katta With Anand Deshpande Full :'अब्जाधीश' मराठी माणूस आनंद देशपांडे यांच्याशी दिलखुलास गप्पा
आय टी विश्वातील नामवंत कंपन्या पैकी एक पर्सिस्टंट कंपनीचे सर्वेसर्वा आनंद देशपांडे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. आपल्या देशात जन्म होऊन जगभरात विस्तारलेल्या विप्रो, इन्फोसिस, टी सी एस या आयटी कंपन्यां प्रमाणे गेल्या काही दशकांत पर्सिस्टंटनेही मोठं नाव कमावलंय. जेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषयच आपल्या देशासाठी नवखा होता तेव्हा आनंद देशपांडेंनी या क्षेत्रात करिअर करुन अमेरिकेत HP सारख्या नामांकित कंपनीत नोकरी मिळवली. तिथे सगळं सुरळीत सुरु असताना ९० च्या दशकात जेव्हा देशात-जगात अस्थिर वातावरण होतं तेव्हाच मायदेशी येत स्वतःची कंपनी सुरु करण्याचा अत्यंत धाडसी निर्णयही घेतला. केवळ २१ हजार डॉलर्सने म्हणजे आत्ताच्या सतरा- अठरा लाखांतून त्यांनी पर्सिस्टंची सुरुवात केली. गेल्या तीन दशकांत मेहनत, सचोटी आणि सातत्याच्या जोरावर पर्सिस्टंटने २१ हजार डॉलर्सची गुंतवणूक १४० कोटी डॉलर्सवर नेलीये. म्हणजे तेव्हाच्या १० लाखांचे आज साडेअकरा हजार कोटी झालेत. ही भरारी त्यांनी कशी घेतली, कोणत्य़ा अडचणी आल्या आणि आता भविष्यातले प्लॅन्स काय याविषयी आनंद देशपांडे यांच्याशी खास संवाद