YouTube Shorts : एका महिन्यात दोन अब्जाहून जास्त वापरकर्त्यांनी पाहिले YouTube Shorts , कमाईतही घसघशीत वाढ
YouTube Shorts मुळे यूट्यूबच्या कमाईत चार टक्क्यांची वाढ झाली असून जाहिरातींमध्येही चांगलीच वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.
Google : व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube च्या शॉर्ट्स व्हिडीो पाहणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. टिकटॉक आणि इन्स्टाग्रामला मागे टाकून YouTube Shorts पाहणाऱ्यांची संख्या ही महिन्याकाठी 2 अब्जाहून जास्त असल्याचं समोर आलं आहे. गेल्या वर्षी ही संख्या 1.5 अब्ज इतकी होती, आता त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे.
Google च्या 2023 दुसऱ्या त्रैमासिक अहवालानुसार, मासिक दोन अब्जाहून अधिक यूजर्सनी YouTube शॉट्स पाहिलं आहे. आकडेवारीचा विचार करता ही संख्या टिकटॉक आणि इन्स्टाग्राम रील्सच्या तुलनेत जास्त असल्याचं सांगण्यात आलं आहे.
कंपनीच्या कमाईत वाढ
गुगलच्या अहवालानुसार, YouTube ने जाहिरातींद्वारे 7.67 अब्ज रुपये म्हणजे अंदाजे 629 अब्ज रुपये कमावले आहेत. ही कमाई अंदाजित रकमेपेक्षा जास्त आहे. यूट्यूब शॉर्ट्समुळे यूट्यूबच्या जाहिरातीमध्येही चार टक्क्यांची वाढ झाली आहे.