(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BHIM App : कॅशबॅकची धमाकेदार ऑफर! या अॅपवर मिळतोय भरघोस गॅरंटीड कॅशबॅक, ऑफर फक्त मर्यादित काळासाठीच
BHIM App वापरणाऱ्या युजर्सना पुढील काही आठवडे खूप फायदा होणार आहे. कारण या अॅपने आपल्या युजर्ससाठी अनेक श्रेणींमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅशबॅक ऑफर आणल्या आहेत.
मुंबई : भारताचे BHIM पेमेंट ॲप युजर्सना 750 रुपयांचा गॅरंटीड कॅशबॅक (CashBack) देत आहे. मात्र, ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. सर्व प्रकारच्या मर्चंट पेमेंटसाठी ही ऑफर उपलब्ध आहे. यामध्ये प्रवास, फूड या सगळ्या प्रकारच्या कॅटेगरीमध्ये ही ऑफर देण्यात आलीये. एवढेच नाही तर, आपल्या सेवांना प्रमोट करण्यासाठी आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी BHIM ॲप पेट्रोल, डिझेल आणि CNG इंधनाच्या पेमेंटवर 1% कॅशबॅक देखील देत आहे.
या सगळ्या ऑफर सध्या BHIM ॲपद्वारे देण्यात येत आहे. या अंतर्गत युजर्स 31 मार्च 2024 पर्यंत लाभ घेऊ शकतात. त्यानंतर ही ऑफर बंद करण्यात येईल. या कालावधीमध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टींवर कॅशबॅक मिळू शकतो. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
ट्रॅव्हल आणि फूड कॅटगरीवर मिळणार कॅशबॅक
BHIM ॲप युजर्सनी फूड आणि ट्रॅव्हलशी संबंधित वस्तूंसाठी 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे व्यवहार केले तर त्यांना 30 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. यामध्ये रेल्वे तिकीट बुकिंग, टॅक्सी, कॅब, बस तिकीट इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय रेस्टॉरंटमध्ये UPI QR कोड स्कॅन केल्यावर देखील कॅशबॅक मिळणार आहे.
या ऑफर अंतर्गत युजर्सना जास्तीत जास्त 150 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. याचा अर्थ युजर्सना खाद्यपदार्थ आणि प्रवासाच्या वस्तूंवर पाचपट कॅशबॅक मिळेल. हा कॅशबॅक थेट BHIM ॲपशी जोडलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. तसेच युजर्सनी हे लक्षात ठेवले पाहिजे की या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, युजर्सकडे BHIM ॲपचे नवीन 3.7 चे अपडेटेड व्हर्जन असावे. त्यामुळे आजच तुमच्या फोनमधील अॅप अपडेट नसेल तर ते अपडेट करुन घ्या.
रुपे क्रेडिट कार्डवर 600 रुपये कॅशबॅक
BHIM ॲप RuPay क्रेडिट कार्ड वापरून कोणत्याही प्रकारचे व्यापारी UPI पेमेंट केल्यावर 600 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. तसेच या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, युजर्सना रुपे क्रेडिट कार्ड BHIM ॲपशी जोडलेले असणे आवश्यक आहे. असे केल्याने यूजर्सना 100 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.
31 मार्चपर्यंत 100 रुपयांहून अधिकचे पहिले तीन पेमेंट केल्यावर युजर्सना 100 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
तुम्ही फेब्रुवारी महिन्यात पुढील 5 व्यवहारांमध्ये 200 रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा व्यवहार केल्यास 30 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
मार्च महिन्यात 200 रुपयांहून अधिकचे पहिले पाच पेमेंट केल्यावर तुम्हाला 30 रुपयांपेक्षा जास्त कॅशबॅक मिळेल.
पाणी, वीज आणि गॅस बिलांवर देखील कॅशबॅक
याशिवाय, युजर्सना 31 मार्च 2024 पर्यंत पेट्रोल, डिझेल, CNC, वीज बिल, पाणी बिल आणि गॅस बिलावर किमान 100 रुपये भरल्यास 1% कॅशबॅक देखील मिळू शकतो.