एक्स्प्लोर

Xiaomi चा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लॉन्च; दमदार फिचर्स अन् आकर्षक लूकची पर्वणी, Flipkart-Amazon वर विक्रीही सुरू

Xiaomi Redmi A3 Smartphone : या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 90Hz चा रिफ्रेश रेट असणारी स्क्रिनदेखील मिळणार आहे.

Xiaomi Redmi A3 Smartphone : आपल्यापैकी सर्वांनाच विशेषत: बजेट फ्रेंडली स्मार्टफोनचं (Smartphone) खास आकर्षण असतं. कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त चांगले फिचर्स असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. याचसाठी अनेक कंपन्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लॉन्च करत असतात. नुकताच Xiaomi ने देखील असाच बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Redmi A3 असं या स्मार्टफोनचं नाव असून तो भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत दहा हजारांहूनही कमी आहे. जे पहिल्यांदाच स्मार्टफोन वापरणार आहेत अशा लोकांसाठी हा स्मार्टफोन बेस्ट ऑप्शन आहे. 

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 90Hz चा रिफ्रेश रेट असणारी स्क्रिनदेखील मिळणार आहे. तसेच, डिव्हाईस हॉलो डिझाईनसह असून यामध्ये सर्क्युलर कॅमेरा आणि लेदर टेक्च्र बॅक पॅनल उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने दमदार बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये आणखी कोणत्या खास गोष्टी आहेत ते जाणून घेऊयात. 

Redmi A3 ची किंमत किती?

Xiaomi Redmi A3 या स्मार्टफोनला कंपनीने तीन वेगवेगळ्या कॉन्फिग्रेशनमध्ये लॉन्च केलं आहे. तसेच, या स्रमार्टफोनची सुरुवातीची किंमत 7,299 रूपयांपासून सुरु होते. यामध्ये ग्राहकांना 3GB RAM +64GB स्टोरेज व्हेरिएंट देण्यात आला आहे. तर, 4GB RAM +128GB स्टोरेजची किंमत 8,299 रूपये आहे. आणि 6GB RAM +128GB व्हेरिएंटची किंमत 9,299 रूपये इतकी आहे. 

जर तुम्हाला हा स्मार्टफोनची खरेदी करायची असेल तर तुम्ही Flipkart-Amazon आणि mi.com वर खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन 23 फेब्रुवारीला सेल होणार आहे. यामध्ये 300 रूपयांचा एक्सचेंज बोनसदेखील देण्यात आला आहे. यानंतर या हॅंडसेटची किंमत 6,999 रूपये आहे. तुम्ही या स्मार्टफोनबरोबर Redmi watch 2 Lite ला 1499 रूपयांमध्ये खरेदी करू शकता.

स्पेसिफिकेशन्स काय असतील? 

Redmi A3 मध्ये कंपनीने 6.7 इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे. जो 90 Hz रिफ्रेश रेटसह सपोर्ट करतो. स्क्रिनच्या प्रोटेक्शनसाठी Corning Gorilla Glass 3 देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G36 प्रोसेसरवर काम करतो. ज्यामध्ये  6GB पर्यंतचा RAM मिळतो. 

या स्मार्टफोनमध्ये 64GB आणि 128GB स्टोरेज ऑप्शन देण्यात आला आहे. यामध्ये 8MP मेन लेंस असणारा ड्युअल रिअर कॅमेरा आहे. ज्यामध्ये AI लेंस देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला कंपनीने 5MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाईसला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी आणि 10 W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. 

तसेच, USB टाईप-सी पोर्ट दिला आहे. हा हॅंडसेट प्री-लोडेड Android 14 वर काम करते. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी स्मार्टफोनमध्ये साईडला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन तीन कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ज्यामध्ये Olive Green, Lake Blue आणि Midnight Black कलर उपलब्ध आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Samsung Galaxy : सॅमसंगच्या 'या' इअरबड्समध्ये Galaxy AI फीचर्सही आहेत; यूजर्सना नेमके कोणते फायदे मिळतील?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP MajhaMedha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Embed widget