एक्स्प्लोर

X New Feature : X (Twitter) मोठा निर्णय! शासकीय ओळखपत्राने होणार आयडी व्हेरिफिकेशन, लवकरच फिचर्स येणार

X (Twitter) Features: X (Twitter) यूजर्सकरता एक नवीन फिचर लवकरच सुरू करणार आहेत. या फिचरच्या मदतीने युजर्ससाठी सरकारी आयडीच्या मदतीने त्यांचे खाते व्हेरिफाय करण्याची परवानगी देण्यात येणार ​​आहे.

X Government Id based verification Feature : इलाॅन मस्क यांनी जेव्हापासून X (Twitter) विकत घेतले तेव्हापासून त्यांनी अनेक बदल केले आहेत. नवनवीन अपडेट्स आणले आहेत. आता पुन्हा X (Twitter) युजर्सकरता एक नवीन फिचर लवकरच सुरू करणार आहेत. या फिचरच्या मदतीने युजर्सना सरकारी आयडीच्या मदतीने त्यांचे खाते व्हेरिफाय करण्याची परवानगी देण्यात येणार ​​आहे. सध्या तरी  हे फिचर सर्वांकरता उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. मात्र काही देशात हे फिचर सुरू करण्यात आले आहे. या वैशिष्ट्याद्वारे, कंपनी प्लॅटफॉर्म सुरक्षित करेल, युजर्सचे फ्रॉडपासून संरक्षण करेल आणि वयाशी संबंधित कंटेंटवर लक्ष केंद्रित करेल, असे सांगण्यात आले आहे.  

हे फिचरचा वापर करत असताना, तुम्हाला एक पाॅप-अप विंडो दिसेल. त्यात, ऑथराइजेशन फीचरला सोपे बनवण्याकरता X ने इज्राईल स्थित कंपनी AU10TIX सह भागीदारी करत असल्याचे लिहिले आहे. वापरकर्त्यांची सर्व माहिती जसे की फोटो, बायोमेट्रिक इत्यादी डेटा AU10TIX द्वारे 30 दिवसांसाठी सेव्ह केला जाईल. म्हणजेच कंपनी डेटाच्या आधारे यूजर्सची पडताळणी करेल. जर हे फिचर भारतात देखील लाइव्ह करण्यात आले, तर कंपनी कोणतीही भारतीय व्हेरिफिकेशन कंपनी/सेवा वापरू शकते.

ज्यावेळी एखादा पेड यूजर सरकारी आयडीच्या मदतीने त्यांचे खाते व्हेरिफाय करेल त्यावेळी त्याच्या अकाउंटवर “this account is ID verified" असे लिहिलेले दाखवेल. हे तेव्हाच होईल ज्यावेळी इतर कोणीतरी प्रीमियम यूजरच्या ब्ल्यू टिकवर क्लिक करेल. याशिवाय, अशा वापरकर्ते ज्यांनी त्यांचे खाते सरकारी आयडीने व्हेरिफाय केले आहे त्यांना कंपनी त्वरीत ब्लू टिक देईल. आणि अशा युजर्सना प्रोफाइल बदलणे, नाव बदलणे ही प्रक्रिया सोपी केली जाईल. मात्र, यात कोणत्या फिचर्सचा समावेश असू शकतो, हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. पण यात सहभागी होणाऱ्यांना कंपनी काही अतिरिक्त फायदेही देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

X (Twitter) वर करता येणार 3 तासांचे व्हिडीओ पोस्ट

एलोन मस्क यांनी पेड यूजर्ससाठी आणखी एक नवीन वैशिष्ट्य दिले आहे. पेड यूजर्स आता X वर 3 तासांपर्यंतचे मोठे व्हिडीओ अपलोड करू शकतात. यूजर्स 1080p मध्ये 2 तासांपर्यंत आणि 720p मध्ये 3 तासांपर्यंत व्हिडीओ पोस्ट करू शकतात. याशिवाय एलॉन मस्क यांनी सशुल्क यूजर्सना एअरप्लेची सुविधा दिली आहे. याअंतर्गत यूजर्स स्मार्ट टीव्हीमध्ये व्हिडीओही प्ले करू शकतात. हे फीचर लांबलचक व्हिडीओ पाहण्यासाठी फायदेशीर आहे. X प्रीमियम यूजर्सना लोकप्रिय व्हिडीओंसाठी पिक्चर-इन-पिक्चर आणि ऑटो कॅप्शनसाठी समर्थन देखील मिळेल. याबरोबरच लाईव्हची व्हिडीओ क्वालिटीही यापूर्वी करण्यात आली आहे. मस्क यांनी अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्ससाठी इमर्सिव्ह व्हिडीओ प्लेअरचे समर्थन केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget