APPLE चे कर्मचारी चॅटजीपीटी CHATGPT वापरू शकत नाहीत, कंपनीचे कठोर आदेश
ChatGPT हे AI तंत्रज्ञानाद्वारे चालवलेले एक नैसर्गिक भाषा प्रक्रिया साधन आहे जे तुम्हाला चॅटबॉटसह (CHATBOT) मानवासारखे संभाषण आणि बरेच काही करण्याची परवानगी देते.
Tech News : ChatGPT तुम्हाला सर्व भाषा, मॉडेल प्रश्नांची उत्तरे देऊ शकते आणि तसेच ईमेल, निबंध आणि कोड तयार करणे यासारख्या कार्यांमध्ये तुम्हाला मदत करू शकते. मात्र आता याच ChatGPT चा वापर अॅपलच्या कर्मचाऱ्यांना करता येणार नाही. तसे आदेशच कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. नेमके कोणत्या कारणामुळे कंपनीने कठोर आदेश दिले ते जाणून घेवूयात.
ChatGPT हे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सर्वात स्मार्ट AI पैकी एक मानले जाते. आता यालाच टक्कर देण्यासाठी गूगलचे AI Bard देखील आले आहे. कंपन्या AI चॅटबॉट वापरत असाल तर ते चांगले आहे. सोबतच याचे काही नुकसानसुद्धा सांगण्यात आले आहे. सध्या अॅपलबाबतच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. असे वृत्त आहे की अॅपलचे कर्मचारी ChatGPT किंवा इतर कोणत्याही कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित साधने वापरू शकत नाही. आता प्रश्न पडतो का? का करू शकत नाही?
Apple कर्मचारी AI का वापरू शकत नाहीत?
वास्तविक पाहता Apple तंतोतंत AI सारखी टेक्नोलॉजी (TECHNOLOGY) तयार करत आहे. अशा परिस्थितीत कंपनीला अशी भीती वाटते आहे की, कर्मचार्यांनी
स्वतःच्या उत्पादनाबद्दलची त्यांची गोपनीय माहिती शेअर करू नये. डब्ल्यूएसजेच्या रिपोर्टवरून हे देखील समोर आले आहे की, अॅपलने कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टमध्ये (MICROSOFT)सहभागी होण्यास सांगितले आहे. तसेच प्रोप्रायटरी GitHub चे Copilot वापरण्यास सांगितले आहे, जे आपोआप सॉफ्टवेअर कोड जनरेट करते.
डेवलपर्सकडे जातो सर्व डेटा
अॅपल (APPLE) कंपनीकडून इतकी सावधानगिरी बाळण्याचं कारण म्हणजे जेव्हा लोक हे AI मॉडेल्स वापरतात तेव्हा विचारलेल्या प्रश्नांचा डेटा डेव्हलपर्स AI सुधारण्यासाठी वापरू शकतात. ज्यामुळे तो डेटा परत पाठवला जातो. यामुळे अनावधानाने वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती शेअर होण्याचा धोका निर्माण होतो. मार्च महिन्यात ChatGPT मध्ये देखील एक त्रुटी आढळली होती. या त्रुटीचे कारण म्हणजे एका यूजरची चॅट हिस्ट्री दुसऱ्या यूजरला दाखवली जात होती. असं असलं तरीही ओपनएआयने OpenAI नंतर एक फीचर सुरू केले जे AI वापरकर्त्यांच्या डेटावर कार्य करण्यास अनुमती देते. जे मॉडेलला प्रशिक्षित होण्यापासून प्रतिबंधित करते. बर्याच संस्था आधीच ChatGPT बद्दल सावध झाल्या आहेत. कारण त्यांचे कर्मचारी ईमेल लिहिणे, मार्केटिंग कंटेंट (MARKETING CONTENT)
तयार करणे आणि सॉफ्टवेअर कोडिंग (software coding) यासारख्या कामांमध्ये विविध कारणांसाठी याचा वापर करतात.
ही बातमी वाचा:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI