Whatsapp : गुड न्यूज! आता एक नाही तर 3 मेसेज करा Pin; व्हॉट्सअपचं नवीन फीचर, 'या' यूजर्सना मिळणार लाभ
Whatsapp New Feature : मेटा सीईओ मार्क झुकरबर्गने एक नवीन अपडेट शेअर केले आहे. झुकेरबर्गने हे अपडेट त्याच्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलद्वारे शेअर केले आहे.
Whatsapp New Feature : व्हॉट्सॲप (Whatsapp) यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला व्हॉट्सअप चॅटबॉक्समध्ये फक्त एकच नाही तर तीन चॅट पिन (Pin Chat) करता येणार आहे. खरंतर, व्हॉट्सॲपने काही महिन्यांपूर्वीच हे विशेष फीचर आणलं होतं. या पिन पोस्टच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला हवे असलेले महत्त्वाचे फक्त एकच चॅट पिन करू शकत होतात. पण, आता तुम्हाला एकाच वेळी तीन मेसेज पिन करता येणार आहे. हे नवीन फीचर कसं काम करेल या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
WhatsApp चं नवीन फीचर
नवीन फीचरनुसार आता यूजर्सना व्हॉट्सॲपमध्ये एकाच वेळी एक, दोन नाही तर तीन चॅट्सना पिन करता येणार आहे. हे पिन केलेले चॅट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात वर पिन करू शकणर आहात. यूजर्स या पिनचा वापर ग्रूप चॅट किंवा पर्सनल चॅटसाठी देखील करू शकतात.
मार्क झुकेरबर्ग यांनी केली नवीन फीचरची घोषणा
व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटाचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी या नवीन फीचरची घोषणा आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून केली आहे. तसेच व्हॉट्सॲपच्या अधिकृत अकाऊंटवरूनही या फीचरची घोषणा करण्यात आली आहे.
3 चॅट पिनचा 'असा' होईल फायदा
या नवीन फीचरच्या मदतीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला महत्त्वाचे चॅट प्रोफाईलच्या शीर्षस्थानी ठेवता येणार आहेत. तसेच, अनेकदा असं होतं की, वैयक्तिक चॅटवर किंवा ग्रूप चॅटवर आपल्याला काही महत्त्वाचं सांगायचं असतं पण चॅटवर असे मेसेज आल्या कारणाने महत्त्वाची माहिती पार खाली जाते. आणि मग ती शोधणं कठीण होतं. अशा वेळी या पिन चॅटचा वापर तुम्ही करू शकता.
'या' मोबाईल धारकांना मिळणार लाभ
व्हॉट्सॲपने हे फीचर अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) या दोन्ही गॅजेट्ससाठी सुरू केले आहे. तसेच, जेव्हा व्हॉट्सअपचं हे नवीन फीचर मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्येही वापरले तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा फक्त एकच नाही तर तीन चॅट पिन करता येत होते. याचाच अर्थ, व्हॉट्सॲपचं हे फीचर केवळ ॲपमध्येच नाही तर वेब व्हर्जनमध्येही अपडेट झालं आहे. या पिन चॅट मुळे सर्वच यूजर्सना याचा लाभ घेता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :