(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Whatsapp New Update : Whatsapp चं नवीन फिचर लवकरच; AIच्या मदतीने यूजर्स स्वतःच स्टिकर्स तयार करू शकणार
Whatsapp New Update :
Whatsapp New Update : AI ने तंत्रज्ञानाच्या जगात एक नवीन क्रांती आणली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसारख्या मोठ्या कंपन्या अनेक नवीन एआय मॉडेल्सवर काम करत आहेत आणि त्यांचे प्लॅटफॉर्म सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. मार्क झुकरबर्गची कंपनी मेटाही यापासून दूर नाही. कंपनी मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. आता ती व्हॉट्सअॅपसाठी नवीन एआय फीचरवर काम करत आहे.
मिळालेल्या अहवालानुसार, मेटा कंपनी व्हॉट्सअॅप एका नवीन एआय (AI) वैशिष्ट्याची चाचणी करत आहे, ज्यामुळे व्हॉट्सअॅप यूजर्सना आपल्या स्वत: च्या अनुसार कस्टमाईज्ड स्टिकर्स बनविण्यात मदत होईल. हे नवीन फीचर टेक्स्ट बेस्ड कमांड्स घेईल. सध्या, समान AI वैशिष्ट्य OpenAI च्या DALL-E किंवा Midjoruney मध्ये देखील उपलब्ध आहे. Wabetainfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp सध्या नवीन AI फीचर 2.23.17.14 व्हर्जनच्या काही Android WhatsApp बीटा प्रोग्राम यूजर्ससाठी आणत आहे.
मात्र, सध्या हे फिचर चाचणीच्या टप्प्यात आहे. परंतु जेव्हा ते सर्व यूजर्ससाठी आणले जाईल, तेव्हा यूजर्सना त्यांच्या स्टिकर पॅनेलमध्ये एक संवाद पर्याय दिसेल. एक बटण देखील असेल जे स्टिकर्स तयार करेल.
या ठिकाणी एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला गेला आहे. ज्यामध्ये नवीन AI फीचर कसे काम करत आहे हे तुम्ही पाहू शकता. हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, यूजर्सना फक्त बटणावर टॅप करावे लागेल. त्यानंतर तुमच्या प्रॉम्प्टद्वारे अनुसरण करून तुम्हाला ते स्टीकर दिसेल. व्हॉट्सअॅप अनेक स्टिकर्स तयार करेल, ज्यामधून तुम्ही तुमच्या आवडीचे स्टिकर निवडू शकता आणि ज्या व्यक्तीशी तुम्ही चॅट करत आहात त्यांना ते पाठवू शकता.
स्टिकर्स सहज ओळखता येतील
WABetaInfo च्या म्हणण्यानुसार, की हे वैशिष्ट्य अॅपमधील स्टिकर पॅनेलवरून उपलब्ध आहे. तुमची निवड दर्शवून तुम्ही समान स्टिकर मिळवू शकता. WhatsApp तुमच्या आवडीचे स्टिकर तयार करेल, जे तुम्ही पोस्ट करू शकता आणि चॅटमध्ये शेअर करू शकता. हे स्टिकर्स सहज ओळखता येतात.
चुकीच्या स्टिकरसाठी तक्रार करू शकता
जर यूजरला स्टिकर्स योग्य वाटले नाहीत, तर तो त्या स्टिकरची तक्रार करू शकतो. यूजर्सकडे चुकीच्या स्टिकर्सची तक्रार करण्याचा पर्याय आहे, परंतु AI स्टिकर्ससाठी कोणते सुरक्षा उपाय केले जातील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या :