एक्स्प्लोर

Vivo चा बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च, 50MP कॅमेरा आणि 8GB RAM फक्त 'या' किंमतीत उपलब्ध

Vivo Y56 5G Launch : नवीन लॉन्च केलेल्या Vivo Y56 5G मध्ये, तुम्हाला 6.58-इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

Vivo Y56 5G Launch : स्मार्टफोन ब्रँड कंपनी Vivo चे अनेक चाहते आहेत. तुम्हीसुद्धा Vivo चे फॅन असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. याचं कारण म्हणजे Vivo ने आपली Y-सिरीज वाढवली आहे. या सीरिजमध्ये Vivo ने आणखी एक नवीन स्मार्टफोन Vivo Y56 5G लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. नव्यानेच लॉन्च झालेल्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 5000mAh मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 50MP चा कॅमेरा मिळेल. Vivo Y56 5G स्मार्टफोनमध्ये आणखी कोणते फिचर्स आहेत ते जाणून घ्या. 

VIVO Y56 5G चे स्पेसिफिकेशन : 

  • डिस्प्ले : 6.58 इंच LCD डिस्प्ले
  • प्रोसेसर : मीडियाटेक डायमेन्सिटी 700 ऑक्टा-कोर प्रोसेसर G52 GPU सह
  • रॅम : 8 जीबी रॅम
  • मागील कॅमेरा : 50MP मुख्य लेन्स आणि 2MP बोकेह सेन्सर
  • फ्रंट कॅमेरा : 16MP सेल्फी कॅमेरा
  • बॅटरी : 5000mAh बॅटरी
  • चार्जिंग : 18W फास्ट चार्जिंग
  • ऑपरेटिंग सिस्टम : Android 13 आधारित FunTouchOS 13
  • सुरक्षा : फिंगरप्रिंट स्कॅनर 

नवीन लॉन्च केलेल्या Vivo Y56 5G मध्ये, तुम्हाला 6.58-इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले मिळतो, ज्याचे रिझोल्यूशन 2408×1080 पिक्सेल आणि 20:9 चा आस्पेक्ट रेशो आहे. या स्मार्टफोनची चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही त्याची रॅम वाढवू शकता. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर स्मार्टफोनमध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट, ब्लूटूथ, ड्युअल सिम, वाय-फाय, जीपीएस आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

VIVO Y56 5G ची किंमत किती? 

हा स्मार्टफोन मिड रेंज कॅटेगरीत बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास याची किंमत 19,999 रुपये आहे. या किमतीत 8GB रॅम+128GB स्टोरेज असलेले व्हेरिएंट उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ऑरेंज शायनर आणि ब्लॅक इंजिन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि रिटेल स्टोअरवरुन हा स्मार्टफोन खरेदी करु शकता.

Infinix NOTE 12i झाला स्वस्त 

Infinix NOTE 12i ची किंमत सध्या Flipkart वर 9,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज दिलं आहे. स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले, 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि समोर 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

फक्त 20 मिनिटांत पूर्ण चार्ज होणारा iQOO Neo 7 स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च; फोनवर मिळतेय 'इतकी' सूट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis On Raj Thackeray-Uddhav Thackeray: मुंबईचा महापौर मराठीचं होणार अन् आमचाच होणार, राज ठाकरेंनी ठणकावले; आता देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुंबईचा महापौर मराठीचं होणार अन् आमचाच होणार, राज ठाकरेंनी ठणकावले; आता देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Sangli Municipal Corporation: पुण्यानंतर सांगलीत सुद्धा भाजपविरोधात घड्याळ्याच्या तालावर तुतारी फुंकण्याची जोरदार तयारी!
पुण्यानंतर सांगलीत सुद्धा भाजपविरोधात घड्याळ्याच्या तालावर तुतारी फुंकण्याची जोरदार तयारी!
Accident: धावत्या बसचा टायर फुटला अन् दुभाजकावर चढून विरुद्ध लेनमध्ये गेली; समोरून येणाऱ्या दोन कार सुद्धा चिरडल्या, 9 जणांचा करुण अंत
धावत्या बसचा टायर फुटला अन् दुभाजकावर चढून विरुद्ध लेनमध्ये गेली; समोरून येणाऱ्या दोन कार सुद्धा चिरडल्या, 9 जणांचा करुण अंत
'ठाकरे होते म्हणून मुख्यमंत्री झाला, तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं? मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं ही मराठी माणसाची केलेली सेवा आहे का तुमची?'
'ठाकरे होते म्हणून मुख्यमंत्री झाला, तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं? मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं ही मराठी माणसाची केलेली सेवा आहे का तुमची?'

व्हिडीओ

Vinayak Pandey PC : ठाकरेंच्या युतीनंतर पेढे वाटणारे विनायक पांडे भाजपात,म्हणाले माझी नाराजी नाही...
Sanjay Raut PC : ठाकरे होते म्हणून मुख्यमंत्री झाला, भाजपनं, फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं?
Varsha Gaikwad On Coffee With Kaushik : मुंबई मविआत मिठाचा खडा का पडला? वर्षा गायकवाड Exclusive
Mahayuti Seat Sharing : सुटला जागांचा वांदा, पण दोन दिवस थांबा Special Report
Sanjay Raut On Thackeray Alliance : युती असो की आघाडी, राऊत बनाए जोडी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On Raj Thackeray-Uddhav Thackeray: मुंबईचा महापौर मराठीचं होणार अन् आमचाच होणार, राज ठाकरेंनी ठणकावले; आता देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुंबईचा महापौर मराठीचं होणार अन् आमचाच होणार, राज ठाकरेंनी ठणकावले; आता देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Sangli Municipal Corporation: पुण्यानंतर सांगलीत सुद्धा भाजपविरोधात घड्याळ्याच्या तालावर तुतारी फुंकण्याची जोरदार तयारी!
पुण्यानंतर सांगलीत सुद्धा भाजपविरोधात घड्याळ्याच्या तालावर तुतारी फुंकण्याची जोरदार तयारी!
Accident: धावत्या बसचा टायर फुटला अन् दुभाजकावर चढून विरुद्ध लेनमध्ये गेली; समोरून येणाऱ्या दोन कार सुद्धा चिरडल्या, 9 जणांचा करुण अंत
धावत्या बसचा टायर फुटला अन् दुभाजकावर चढून विरुद्ध लेनमध्ये गेली; समोरून येणाऱ्या दोन कार सुद्धा चिरडल्या, 9 जणांचा करुण अंत
'ठाकरे होते म्हणून मुख्यमंत्री झाला, तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं? मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं ही मराठी माणसाची केलेली सेवा आहे का तुमची?'
'ठाकरे होते म्हणून मुख्यमंत्री झाला, तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं? मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं ही मराठी माणसाची केलेली सेवा आहे का तुमची?'
कोल्हापुरात इकडं काँग्रेस ठाकरे सेनेचं ठरलं, तिकडं 'जनसुराज्य'ची सुद्धा एन्ट्री; 70 इच्छुकांच्या मुलाखती घेताच आमदार विनय कोरे काय म्हणाले?
कोल्हापुरात इकडं काँग्रेस ठाकरे सेनेचं ठरलं, तिकडं 'जनसुराज्य'ची सुद्धा एन्ट्री; 70 इच्छुकांच्या मुलाखती घेताच आमदार विनय कोरे काय म्हणाले?
Nashik Election BJP: इकडे देवयानी फरांदेंनी भाजप प्रवेशाची वाट रोखली, तिकडे संजय राऊतांनी हकालपट्टी केली, यतीन वाघ, विनायक पांडे मध्येच लटकले
इकडे देवयानी फरांदेंनी भाजप प्रवेशाची वाट रोखली, तिकडे संजय राऊतांनी हकालपट्टी केली, यतीन वाघ, विनायक पांडे मध्येच लटकले
Sandeep Despande: राज-उद्धव युतीनंतर संदीप देशपांडेंचा पहिला वार, 'बटोगे तो पिटोगे' घोषणेला काऊंटर चॅलेंज, म्हणाले...
राज-उद्धव युतीनंतर संदीप देशपांडेंचा पहिला वार, 'बटोगे तो पिटोगे' घोषणेला काऊंटर चॅलेंज, म्हणाले...
Rohit Sharma News : तुला वडापाव हवाय का?, मी घेऊन आलोय; भर सामन्यात प्रेक्षक ओरडला, रोहित शर्माची धमाकेदार रिअॅक्शन, Video तुफान व्हायरल
तुला वडापाव हवाय का?, मी घेऊन आलोय; भर सामन्यात प्रेक्षक ओरडला, रोहित शर्माची धमाकेदार रिअॅक्शन, Video तुफान व्हायरल
Embed widget