सोनी कंपनीने आणला चालता-फिरता एसी, मानेवर लावताच गरमीपासून होणार सुटका!
हे उपकरण मानेवर लावता येते. व्यक्तीच्या आजूबाजूचे वातावरण कसे आहे, याचा अभ्यास हे उपकरण करते. तसा दावा सोनी या कंपनीने केला आहे.
मुंबई : सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. या उन्हामुळे लोकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. उष्माघात होऊ नये म्हणून घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातोय. घरातही लोक एसी लावून बसतायत. पण नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत याच उष्णतेचा सामना करण्यासाठी सोनी या कंपनीने एक खास उपकरण लॉन्च (Sony company wearable AC) केले आहे. हे उपकरण अंगावर लावता येणार असून त्यामुळे शरीर थंड राहणार आहे.
मानेवर लावता येणार उपकरण
सोनीने या उपकरणाला स्मार्ट विअरेबल थर्मो डीव्हाईस कीट रिऑन पॉकेट 5 असे नाव दिले आहे. सोनीने हे अपकरण 23 एप्रिल रोजी लॉन्च केले आहे. हे उपकरण शरीरावर लावता येणार असून त्याद्वारे तापमान नियंत्रित ठेवता येईल, असा दावा सोनी या कंपनीने केला आहे. हे उपकरण व्यक्तीच्या मानेवर लावता येईल. रेऑन पॉकेट 5 या उपकरणात एकूण पाच कुलिंग लेव्हल तसेच बाहेरील वातावरणात गारवा असेल 4 वार्मिंग लेव्हल आहेत.
अॅपच्या माध्यमातून आज्ञा देता येणार (What is Reon Pocket 5)
रिऑन पॉकेट 5 या उपकरणाला रिऑन पॉकेट अॅपच्या माध्यमातून नियंत्रित करता येते. हे उपकरण मानेवर लावल्यानंतर ब्लुटूथच्या माध्यमातून त्यातील चार वार्मिंग आणि पाच कुलिंग लेव्हल नियंत्रित करता येतील. या उपकरणाला एकदा चार्जिंग केल्यानंत ते साधारण 17 तास काम करू शकते. तसा दावा कंपनने केला आहे.
विक्रीसाठी उपलब्ध (Pre Order Reon Pocket 5)
विशेष म्हणजे सोनी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर हे उपकरण विक्रीसाठी उपलब्ध आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार रेऑन पॉकेट 5 या उपकरणाची किंमत ही 139 पाऊंड (170 डॉलर्स) आहे. सध्या या उपकरणाची प्रिऑर्डर बुक करता येत आहे. 15 मे रोजीनंतर ऑर्डर्सनुसार हे उपकरण तुमच्या पत्त्यावर तुम्हाला पाठवले जाईल.
हेही वाचा :
ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
बंपर धमाका! iPhone वर 50 हजार रुपयांची सवलत, आज ऑफर मिळवण्याची आज शेवटची संधी