Smartphone : फोनवरून महत्त्वाचे फोटो डिलीट झालेत? काळजी करू नका; 'या' 3 पद्धतींनी काही क्षणात फोटोंचा बॅकअप मिळणार
Smartphone : अनेकवेळा जुने फोटो डिलीट करण्याचा प्रयत्न करताना महत्त्वाचे फोटो डिलीट होतात.
Smartphone : जेव्हापासून स्मार्ट आणि अॅडव्हान्स स्मार्टफोन (Smartphone) बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे तेव्हापासून कॅमेऱ्याची गरज संपत चालली आहे. याचं कारण म्हणजे आजकाल बाजारात येणारे अनेक स्मार्टफोन हे स्पेशल कॅमेरा क्वालिटी असणारे असतात. जिथे व्यावसायिक फोटो किंवा व्हिडीओसाठी मोठे आणि महागडे कॅमेरे खरेदी केले जात होते. आता त्याची जागा स्मार्टफोन्सने घेतली आहे. कारण आता फोनमध्ये असे खास कॅमेरे आले आहेत ज्यामधून अगदी भन्नाट फोटो निघतात. तुमच्या स्मार्टफोनने देखील चांगले फोटो येत असतील आणि फोटोज काढून तुमची गॅलरी फुल्ल झाली असेल तर अशा वेळी सर्वात जास्त फटका बसतो तो तुमच्या गॅलरीवर. यासाठी अनेकदा आपल्याला जुने फोटो डिलीट करावे लागतात. पण, तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही. या ठिकाणी आम्ही तुम्हाला खास टिप्स सांगणार आहोत.
अनेकवेळा जुने फोटो डिलीट करण्याचा प्रयत्न करताना महत्त्वाचे फोटो डिलीट होतात. पण, मग टेन्शन कायम राहतं की फोनमधून महत्त्वाचे फोटो डिलीट झाले तर ते कसे रिकव्हर होणार? अशा वेळी तुम्ही तुमचे हटवलेले फोटो परत मिळवू शकता. फोनवरून फोटो डिलीट केल्यावर तो आपोआप Trash मध्ये जातात हे अनेकांना माहीत असेल.
बॅकअप घेतलेले डिलीट फोटो साधारण 60 दिवसांसाठी Trash मध्ये राहतात. तर बॅकअप न केलेले फोटो 30 दिवसांसाठी Trash मध्ये राहतात. फोटो आणि व्हिडीओ तुमच्या Trash फोल्डरमध्ये असतील तरच तुम्ही ते रिस्टोअर करू शकता. एकदा तुम्ही Trash Folder रिकामं केलं की, त्यातील फोटो रिस्टोर केले जाऊ शकत नाहीत.
Trash Folder
Trash फोल्डरमध्ये डिलीट केलेले फोटो रिस्टोर करण्यासाठी, तुम्ही रिस्टोर करू इच्छित फोटो शोधा आणि 'Restore' ऑप्शनवर क्लिक करा. फोटो तुमच्या फोन गॅलरी किंवा Google Photos लायब्ररीमध्ये रिस्टोअर केला जाईल.
Archive Folder
अनेकदा आपल्या हातून चुकून आपले फोटो Archive होतात आणि आपल्याला असं वाटतं की ते फोटो आपल्याकडून डिलीट झाले आहेत. डिलीट झालेल्या फोटोंसाठी Archive फोल्डर तपासणे कठीण होऊ शकते. तुम्हाला तुमचे डिलीट झालेले फोटो आर्काइव्ह फोल्डरमध्ये आढळल्यास, फक्त 'अनअर्काइव्ह' ऑप्शन सिलेक्ट करा. यानंतर हा फोटो गॅलरीत रिस्टोअर केला जाईल.
तुम्ही तुमचे डिलीट झालेले फोटो Google Drive मध्ये स्टोअर केले असल्यास, Google ला ते रिस्टोअर करण्याची विनंती करण्याचा एक मार्ग आहे.
यासाठी, सर्वात आधी Google ड्राईव्हवर जा आणि नंतर Help Page वर क्लिक करा. येथून 'मिसिंग किंवा डिलीट केलेल्या फाईल्स' वर टॅप करा.
आता तुम्हाला पॉप-अप बॉक्समध्ये दोन ऑप्शन्स दिसतील. यामध्ये पहिला पर्याय 'रिक्वेस्ट चॅट' आणि दुसरा पर्याय 'ईमेल सपोर्ट' आहे. येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही एक निवडू शकता.
या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल की तुम्हाला फोटो/फाईल रिस्टोअर करण्यासाठी Google ची गरज का आहे. ते शक्य असल्यास गुगल डिलीट केलेला फोटो किंवा फाईल रिस्टोअर करू शकते.
Third Party Apps : डिलीट झालेले किंवा केलेले फोटो पुन्हा परत मिळवण्यासाठी तुम्ही थर्ड पार्टी ॲप्स वापरू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :