मोठी बातमी! आता नव्या सिमकार्ड खरेदीसाठी नियम बदलला, 'ही' चूक केली तर होणार कठोर कारवाई
Sim Card Purchasing Guidelines : केंद्र सरकारने टेकलॉम विभागाला निवे निर्देश दिले आहेत. या आदेशानंतर आता सिमकार्ड खरेदीचा नियम बदलण्यात आला आहे.
मुंबई : आजकाल सायबर क्राईमचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. प्रत्येक दिवशी देशाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात सायबर क्राईमच्या माध्यमातून फसवणुकीची, आर्थिक लुबाडणुकीची घटना घडताना दिसते. बनावट कागदपत्रे सादर करून खरेदी केलेल्या सिम कार्डच्या मदतीने सर्सास सायबर क्राईमचे गुन्हे केले जातात. या प्रकारांना आळा बसावा यासाठी आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशानुसार आता नवे सिमकार्ड खरेदी करण्याच्या नियमात बदल करण्यात आली आहे. या नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
नेमका काय निर्णय घेण्यात आला?
पंतप्रधान कार्यालयाने केंद्र सरकारच्या टेलकॉम विभागाला नव्या सिमकार्डच्या खरेदीबाबत काही निर्देश दिले आहेत. या निर्देशांनुसार आता कोणत्याही कंपनीचे सिमकार्ड खरेदी करायचे असेल तर त्यासाठी अगोदर आधार नंबरवर आधारलेली बायमॅट्रिक व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. खोटी कागदपत्रे सादर करून सिमकार्ड खरेदी करण्याच्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी बनावट कागदपत्रे सादर करून सिमकार्ड खरेदी करण्याचे याआधी अनेक प्रकार समोर आले आहेत. याच बनावट कागदपत्रांचा नंतर वेगवेगळ्या अवैध कामांसाठी वापर केला जातो. या सर्व प्रकारांना आळा बसावा यासाठी घेतल्याचं सांगण्यात येतंय.
बायोमॅट्रिक व्हेरिफेकशन गरजेचे
याआधी एखाद्या व्यक्तीला नवे सिमकार्ड खरेदी रायचे असेल तर कोणतेही शासकीय ओळखपत्र वापरता येत होते. यात मतदार ओळखपत्र, पासपोर्ट यांचा वापर करता येत होता. या कागदपत्रांसह सिमकार्डला अॅक्टिव्ह करायचे असेल तर त्यासाठी आधार क्रमांकावर आधारलेले बायोमॅट्रिक व्हेरिफेकशन गरजेचेच आहे. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानंतर आता सिमकार्डची विक्री करणारे आधारच्या बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनवीना सिमाकार्ड विकू शकणार नाहीत.
...तर कठोर कारवाई होणार
दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर आता नबावट कादगपत्रे देऊन सिमकार्ड खरेदी करणाऱ्यांवर आळा बसेल. असे प्रकार समोर आलेच तर तपास संस्थांनी तसेच संबंधित विभागांनी कारवाई करावी, असा आदेशही केंद्र सरकारने दिला आहे. त्यामुळे आता एखादी व्यक्ती बनावट कागदपत्रे देऊन सिमकार्ड खरेदी करत असेल तर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
हेही वाचा :
44 वर्षाच्या श्वेता तिवारीचं मनोहारी सौंदर्य, लेकीपेक्षा दिसते भारी; नव्या फोटोशूटने चाहते घायाळ!