प्रदर्शित होण्याआधीच सलमानचा 'सिकंदर' बनला नंबर वन, IMDb ने जारी केलेल्या टॉप 20 चित्रपटांत कोणाकोणाचा समावेश?
आयमडीबीने नुकतेच 2025 सालच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. या यादीत सलमान खानचा चित्रपट प्रथम क्रमांकावर आला आहे.
मुंबई : मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb (www.imdb.com) ने 2025 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीची घोषणा केली. जगभरातून IMDb वर दर महिन्याला येणाऱ्या 25 कोटींहून अधिक व्हिजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार ही यादी तयार करण्यात आली आहे.
सलमानचा सिकंदर चित्रपट नंबर वन
सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये क्रमांक 1 वर सिकंदर हा चित्रफट आला आहे. या चित्रपटात सलमान खान हा प्रमुख भूमिकेत आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदोस यांनी केलेले आहे. “2025 च्या IMDb च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये सिकंदर पहिल्या स्थानी बघून मला अतिशय आनंद वाटत आहे. सलमान खानसोबत काम करणे विलक्षण होते. त्याच्या ऊर्जेमुळे व कामाबद्दलच्या निष्ठेमुळे अनेक अर्थांनी सिकंदर जिवंद झाला आहे. हा आनंद शब्दांमध्ये सांगता येऊ शकत नाही. हे घडवून आणल्याबद्दल साजिद नाडियदवालाला खूप धन्यवाद. सिकंदरमधील प्रत्येक दृश्य अविश्वसनीय आठवण राहील अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया मुरुगदोस यांनी दिली.
2025 चे IMDb चे सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपट
1. सिकंदर
2. टॉक्झिक
3. कुली
4. हाऊसफुल 5
5. बागी 4
6. राजा साब
7. वॉर 2
8. L2: एंपुरान
9. देवा
10. छावा
11. कन्नप्पा
12. रेट्रो
13. ठग लाईफ
14. जाट
15. स्काय फोर्स
16. सितारे जमीन पर
17. थामा
18. कंतारा ए लीजंड: चॅपटर 1
19. अल्फा
20. थांडेल
कोणाच्या कोणत्या चित्रपटाचा या यादीत समावेश
विशेष म्हणजे या 20 चित्रपटांच्या यादीत एकूण 11 चित्रपट हे हिंदी भाषेतील आहेत. तीन तमिळ व एक तेलुगू भाषेतील चित्रपट आहे. दोन कन्नड भाषेतील तर एक मल्याळम भाषेतील चित्रपट आहे. टॉपच्या या 20 चित्रपटांत अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेले एकूण तीन चित्रपट आहेत. हाऊसफुल 5 (क्र. 4), कन्नाप्पा (क्र. 11) आणि स्काय फोर्स (क्र. 15) अशी या तीन चित्रपटांची नावे आहेत. रश्मिका मंदानास प्रमुख नायिकेच्या भूमिकेत असलेले तीन चित्रपटही यात समाविष्ट आहेत. सिकंदर (क्र. 1), छावा (क्र. 10) आणि थामा (क्र. 17), अशी या चित्रपटांची नावे आहेत. मोहनलाल, प्रभास, पूजा हेगडे आणि कियारा अडवानी यांच्या प्रत्येकी दोन चित्रपटांचा टॉप 20 बहुप्रतिक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीत समावेश आहे. या यादीतील पाच चित्रपट हे प्रसिद्ध फ्रँचायजींचे सीक्वेल्स किंवा पुढचे भाग आहेत. यामध्ये हाऊसफुल 5 (क्र. 4), बाग़ी 4 (क्र. 5), वॉर 2 (क्र. 7), सितारे ज़मीं पर (क्र. 16), आणि कंतारा अ लिजेंड: चॅपटर 1 (क्र. 18), अशी त्यांची नावे आहेत.
हेही वाचा :
44 वर्षाच्या श्वेता तिवारीचं मनोहारी सौंदर्य, लेकीपेक्षा दिसते भारी; नव्या फोटोशूटने चाहते घायाळ!