एक्स्प्लोर

Samsung Galaxy XCover 7 : यूएस मिलिट्री सर्टिफाईड पहिला स्मार्टफोन भारतात लॉन्च; सॅमसंगच्या या फोनची 'ही' आहे खासियत

Samsung Galaxy XCover 7 : सॅमसंगने भारतात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो सामान्य स्मार्टफोन नसून यूएस आर्मीकडून प्रमाणपत्र मिळालेला स्मार्टफोन आहे.

Samsung Galaxy XCover 7 : सॅमसंग (Samsung) कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवीन अपडेट घेऊन येत असते. Samsung ने यावेळेस भारतात आपला नवीन स्मार्टफोन  Samsung Galaxy XCover 7 लॉन्च केला आहे. हा सॅमसंगचा भारतातील पहिला एंटरप्राइज-केंद्रित आणि रग्ड स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही हा अत्यंत कठीण परिस्थिती जसे की, पठारी भागात, डोंगराळ भागात याचा वापर अगदी सहजपणे करू शकता. हा स्मार्टफोन विशेषत: सैन्यांसाठी बनविण्यात आला आहे. हा स्मार्टफोन MIL-STD-810H द्वारे प्रमाणित आहे, जे यूएस सैन्याद्वारे डिव्हाईसची ताकद मोजण्यासाठी वापरले जाणारे एक टेस्टिंग स्टॅंडर्ड आहे. 

सॅमसंगने खास फोन लाँच केला

Samsung Galaxy XCover 7 चा हा स्मार्टफोन जानेवारी 2024 मध्ये जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आला होता. पण, आता तो भारतातही लॉन्च करण्यात आला आहे. सॅमसंगने हा स्मार्टफोन भारतात स्टँडर्ड आणि एंटरप्राइज एडिशन या दोन व्हर्जनमध्ये लॉन्च केला आहे. या दोन स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 27,208 रुपये आणि 27,530 रुपये आहे. Galaxy Xcover 7 रग्ड स्मार्टफोन सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोअर आणि सॅमसंग कॉर्पोरेट स्टोअर्सद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. 

सॅमसंग यूजर्स पोर्टलला भेट देऊन मोठ्या प्रमाणात या स्मार्टफोनची ऑर्डर देऊ शकतात. तसेच, कंपनीकडून Galaxy XCover 7 Enterprise Edition वर Knox Suite ची 12 महिन्यांची मोफत मेंबरशीप देखील देण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या स्टॅंडर्ड व्हेरिएंटची एक वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे. तर, एंटरप्राइझ संस्करण 2 वर्षांच्या वॉरंटीसह येतो.

या फोनचे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले : या फोनमध्ये 6.6 इंच TFT LCD स्क्रीन आहे, जी फुल एचडी प्लस रिझोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्लस संरक्षणासह येते.

कॅमेरा : या फोनच्या मागील भागात LED फ्लॅशसह 50MP रियर कॅमेरा सेंसर आहे. फोनच्या पुढील भागात 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

प्रोसेसर : या फोनमध्ये प्रोसेसरसाठी MediaTek Dimensity 6100+ SoC चिपसेट आहे, जो ग्राफिक्ससाठी Mali G57 GPU सपोर्टसह येतो.

सॉफ्टवेअर : हा फोन Android 14 वर आधारित OneUI वर चालतो.

बॅटरी : या फोनमध्ये 4050mAh बदलण्यायोग्य बॅटरी आहे, जी 15W जलद चार्जिंगसह येते. या फोनमध्ये USB Type-C पोर्ट आणि चार्जिंगसाठी POGO पिन आहेत.

कनेक्टिव्हिटी : या फोनमध्ये ड्युअल-सिम (नॅनो + eSIM), 5G, WiFi 5, Wi-Fi Direct, Bluetooth 5.3, NFC, GPS, GLONASS, Galileo सारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

WhatsApp Upcoming Feature : आता यूजर्स व्हॉट्सॲपवरून कोणत्याही ॲपवर मेसेज पाठवू शकणार; Whatsapp चं नवं फीचर लवकरच

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget