एक्स्प्लोर

Samsung Galaxy M14 5G : सॅमसंगने वर्षातील पहिला M सीरीज स्मार्टफोन केला लॉन्च; मिळणार 6000mAh ची दमदार बॅटरी, जाणून घ्या किंमत

Samsung Galaxy M14 5G : स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने 2023 चा Galaxy M सीरीजचा पहिला फोन लॉन्च केला आहे. Samsung Galaxy M14 असे या फोनचे नाव आहे.

Samsung Galaxy M14 5G : स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने 2023 चा Galaxy M सीरीजचा पहिला फोन लॉन्च केला आहे. Samsung Galaxy M14 असे या फोनचे नाव आहे. मात्र हा फोन अजून भारतात लॉन्च झालेला नसून युक्रेनमध्ये लॉन्च झाला आहे. लवकरच हा फोन ग्लोबल मार्केटमध्येही लॉन्च केला जाईल, अशी अपेक्षा आहे. फोनच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले, तर हा Galaxy A14 5G सारखा आहे. A सीरीजचा Galaxy A14 5G स्मार्टफोन कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केला होता. चला तर जाणून घेऊया Samsung Galaxy M14 ची किंमत आणि फीचर्स.

Samsung Galaxy M14 चे फीचर्स 

  • डिस्प्ले: 6.6-इंचाचा PLS LCD डिस्प्ले
  • रिझोल्यूशन: 1080 x 2408 पिक्सेल
  • ऑपरेटिंग सिस्टम: Android 13 वर आधारित OneUI 5
  • रॅम आणि स्टोरेज: 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज
  • बॅटरी: 6,000mAh बॅटरी
  • चार्जिंग: 25W फास्ट चार्जिंग
  • कनेक्टिव्हिटी: ड्युअल सिम कार्ड सपोर्ट, वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, NFC, GPS

Samsung Galaxy M14 च्या डिस्प्लेमध्ये Infinity-V नॉच डिझाइन देण्यात आले आहे, जे FHD+ रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 2.4GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि इन-हाउस Exynos 1330 प्रोसेसर आहे. फोनची इंटरनल मेमरी देखील मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. सुरक्षेसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनमधील प्रायमरी कॅमेरा 50MP, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M14 5G किंमत

Samsung Galaxy M14 5G दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 4GB RAM + 64GB आणि 4GB RAM + 128GB समाविष्ट आहे. त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत UAH 8,299 (अंदाजे 18,265 रुपये) आहे आणि टॉप व्हेरियंटची किंमत UAH 8,999 (अंदाजे 19,806 रुपये) आहे. हा डार्क ब्लू, ब्लू आणि सिल्व्हर या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

Oneplus Ace 2V देखील लॉन्च

चिनी स्मार्टफोन कंपनी OnePlus ने नवीन स्मार्टफोन OnePlus Ace 2V लॉन्च केला आहे. कंपनीने मोबाईल फोन 3 स्टोरेज पर्यायांमध्ये सादर केला आहे. ज्यामध्ये बेस व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 27,000 रुपये आहे. सध्या हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे, जो लवकरच जागतिक स्तरावरही लॉन्च केला जाईल. हा OnePlus Nord 3 या नावाने जागतिक बाजारपेठेत येईल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget