एक्स्प्लोर
Samsung Galaxy F55 5G दमदार स्मार्टफोन भारतात लाँच, लेदर डिझाईन अन् वजनाला अतिशय हलका; फिचर्स आणि किंमत पाहा
Samsung Galaxy F55 5G : गॅलेक्सी F55 5G दमदार स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. सॅमसंगच्या एफ सीरीजमधील हा पहिला लेदर डिझाईन स्मार्टफोन असून वजनाला अतिशय हलका आहे. याचे फिचर्स आणि किंमत जाणून घ्या.
मुंबई : सॅमसंग (Samsung) कंपनीने आज सर्वात प्रिमिअम गॅलेक्सी एफ सीरीज स्मार्टफोन गॅलॅक्सी एफ55 5G (Samsung Galaxy F55 5G) भारतात लाँच केला आहे. महत्त्वाचं म्हणजे सॅमसंगने भारतीय बाजारात पहिल्यांदा हलक्या आकाराचा आणि स्लीक डिझाईन असलेला लेदर स्मार्टफोन लाँच केला आहे. सॅमसंग भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडपैकी एक असून याचे कोट्यवधी ग्राहक आहेत. या पार्श्वभूमीवर सॅमसंगने नवीन आकर्षक फोन बाजारात आणला आहे. गॅलेक्सी एफ55 5G ची स्लीक आणि स्टायलिश आकर्षक डिझाईन, तसेच प्रिमिअम वेगन लेदर फिनिश बॅक पॅनेल लक्ष वेधतात. गॅलेक्सी एफ55 5G सह सॅमसंग पहिल्यांदाच F-सिरीज पोर्टफोलिओमध्ये क्लासी वेगन लेदर डिझाइन असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी F55 5G चे भन्नाट फिचर्स
- गॅलेक्सी F55 5G सुपर एएमओएलईडी+ डिस्प्ले, शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 प्रोसेसर आहे.
- यामध्ये 45 वॅट सुपर-फास्ट चार्जिंग, अँड्रॉईड अपग्रेड्सचे 4 जनरेशन्स आणि 5 वर्ष सिक्युरिटी अपडेट्स अशा सेगमेंट-फिचर्ससह वरचढ ठरतो. यामुळे यूजर्स वर्षभरासाठी नवीन फिचर्स आणिअपडेट्सचा लाभ घेऊ शकतात.
- गॅलेक्सी एफ55 5G सह सॅमसंग पहिल्यांदाच एफ सिरीजमध्ये क्लासी वेगन लेदर डिझाइनसह सॅडल स्टिच पॅटर्न आणला आहे.
- क्लासी वेगन लेदर बॅक पॅनेलसह सॅडल स्टिच पॅटर्न आणि सोनेरी रंगामधील कॅमेरा डेकोमधून आकर्षक दिसतो.
- गॅलॅक्सी F55 5G अॅप्रीकोट क्रश आणि रेझिन ब्लॅक या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल.
- तसेच सुपर एएमओएलईडी+ 120 हर्टझ डिस्प्ले, शक्तिशाली स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसोबत ओएस अपग्रेडच्या 4 जनरेशन्सचे अद्वितीय प्रॉमिस आणि पाच वर्ष सिक्युरिटी अपडेट्स आणि नॉक्स सिक्युरिटी अशा सर्वोत्तम फिचर्ससह सॅमसंगने नवीन स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीसाठी आणला आहे.
सॅमसंग इंडियाच्या एमएक्स डिव्हिजनचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू पुल्लन यांनी सांगितलं की, सॅमसंम कंपनी ग्राहकांना उच्च दर्जाचा अनुभव देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे.
क्लासी वेगन लेदर डिझाइन
गॅलॅक्सी F55 5G या वर्षातील सर्वात हलका आणि स्लीन डिझाईन असलेला वेगन लेदर स्मार्टफोन असणार आहे.या स्मार्टफोनचे वजन फक्त 180 ग्रॅम आणि रूंदी अत्यंत स्लीक 7.8 मिमी आहे, ज्यामुळे बहा फोन वापरण्यास अत्यंत सुलभ आहे.
आकर्षक डिस्प्ले
6.7 इंच फुल HD+ सुपर एएमओएलईडी+ डिस्प्ले असलेला गॅलॅक्सी F55 5G ग्राहकांना आकर्षक व्हिज्युअल्स आणि सुधारित व्युइंग अनुभव देतो. मोठ्या डिस्प्लेमध्ये 1000 नीट्स उच्च ब्राइटनेस आहे आणि व्हिजन बूस्टर तंत्रज्ञान युजर्सना प्रखर सूर्यप्रकाशात देखील त्यांचे आवडते कन्टेन्ट सुस्पष्टपणे पाहण्यास मदत करते. 120 हर्टझ रिफ्रेश रेट तंत्रज्ञान-प्रेमी जनरेशन झेड आणि मिलेनियल ग्राहकांसाठी सोशल मीडिया सहजपणे स्क्रोल करण्याची सुविधा देते.
शक्तिशाली प्रोसेसर
गॅलॅक्सी F55 5G मध्ये 4 एनएम क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 प्रोसेसरची शक्ती आहे, ज्यामुळे युजर्स सहजपणे मल्टी-टास्क करू शकतात. अल्टिमेट स्पीड आणि 5G कनेक्टीव्हीटीसह यजर्स कुठेही पूर्णपणे कनेक्टेड राहू शकतात, जलद डाऊनलोड करु शकतात, सुरळीतपणे स्ट्रिमिंग करू शकतात आणि विनाव्यत्यय ब्राऊजिंगचा आनंद घेऊ शकतात. प्रोसेसर उच्च दर्जाचा ऑडिओ आणि व्हिज्युअल्ससोबत हाय-स्पीड कनेक्टीव्हीच्या माध्यमातून भन्नाट मोबाइल गेमिंगचा अनुभव मिळेल.
नाइटोग्राफी कॅमेरा
गॅलॅक्सी F55 5G मध्ये हाय-रिझॉल्यूशन आणि कोणत्याही हालचालींशिवाय व्हिडिओज आणि फोटो कॅप्चर करण्यासाठी 55 MP (ओआयएस) नो शेक कॅमेरा आहे, ज्यामुळे हात थरथरल्यामुळे किंवा नकळतपणे हालचालींमुळे फोटो ब्लर होण्याची शक्यता दूर होते. कॅमेरा सेटअपमध्ये 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेन्सर देखील आहे, गॅलॅक्सी F55 5G मध्ये नाइटोग्राफी आहे, जे युजर्सना कमी किंवा अंधुक प्रकाशात देखील आकर्षक फोटो आणि व्हिडिओज कॅप्चर करता येतील. गॅलॅक्सी F55 5G मध्ये 50 मेगापिक्सल हाय रिझॉल्यूशन फ्रण्ट कॅमेरा आहे, ज्यामधून आकर्षक आणि सर्वोत्तम सेल्फीज काढता येतात.
सुपर-फास्ट चार्जिंग
गॅलॅक्सी F55 5G मध्ये 5000 एमएएच बॅटरी आहे, जी दीर्घकाळापर्यंत ब्राऊजिंग, गेमिंग व कन्टेन्ट पाहण्याचा आनंद देते. गॅलॅक्सी F55 5G युजर्सना कनेक्टेड राहण्याची, मनोरंजनाचा आनंद घेण्याची सुविधा देतो. गॅलॅक्सी F55 5G मध्ये 45 वॅट सुपर-फास्ट चार्जिंग आहे, ज्यामुळे स्मार्टफोन कमी वेळेत पूर्णपणे चार्ज होतो.
गॅलॅक्सी एक्स्पेरिअन्स
गॅलॅक्सी F55 5G मध्ये दर्जात्मक, डिफेन्स ग्रेड नॉक्स सिक्युरिटी असेल, ज्यामधून वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्टफोनमधील गोपनीयता आणि सुरक्षिततेसंदर्भात कोणतीही चिंता करण्याची गरज भासणार नाही. गॅलॅक्सी F55 5G मध्ये सॅमसंगचे सर्वात नाविन्यपूर्ण सुरक्षितता फिचर सॅमसंग नॉक्स वॉल्ट देखील असेल. हे फिचर हार्डवेअर-आधारित सिक्युरिटी सिस्टम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अॅटॅक्सविरोधात संरक्षण देते.
गॅलॅक्सी F55 5G नाविन्यपूर्ण फिचर्ससह ग्राहक अनुभवामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्यास सज्ज आहे.
वॉइस फोकस - आसपासचा आवाज कमी करत अद्भुत कॉलिंग अनुभव देते
क्विक शेअर फिचर - युजर्सना दूर असताना देखील लॅपटॉप, टॅब अशा इतर कोणत्याही डिवाईसमधून त्वरित फाइल्स, फोटो आणि डॉक्युमेंट्स शेअर करण्याची सुविधा देते.
तसेच, सॅमसंग गॅलॅक्सी F55 5G सह ओएस अपग्रेड्सचे चार जनरेशन्स आणि पाच वर्ष सिक्युरिटी अपडेट्स मिळतील.
किंमत किती?
सॅमसंग गॅलॅक्सी F55 5G फ्लिपकार्ट, Samsung.com आणि निवडक रिटेल स्टोअर्समध्ये 3 स्टोरेज व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल.
- Galaxy F55 5G 8GB+128GB ची किंमत 26999 रुपये असेल. यामध्ये तुम्हाला विविध बँक कार्डवर 2000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. (INR 2000 Instant Discount on multiple Bank Cards [HDFC Bank / Axis Bank / ICICI Bank) यामुळे हा फोन तुम्हाला 24999 रुपयांना उपलब्ध होईल.
- याशिवाय, Galaxy F55 5G 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 29999 असून बँक कार्डवरील ऑफरमध्ये हा तुम्हाला 27999 रुपयांना उपलब्ध होईल.
- Galaxy F55 5G फोनचा 12GB+256GB व्हेरियंट 32999 रुपयांना असून ऑफरमध्ये हा स्मार्टफोन तु्म्हाला 30999 रुपयांना मिळेल.
तसेच, लिमिटेड पीरियड ऑफरमध्ये ग्राहक फक्त 499 रूपयांमध्ये 45 वॅट सॅमसंग ट्रॅव्हल अॅडप्टर किंवा फक्त 1999 रूपयांमध्ये गॅलॅक्सी फिट3 खरेदी करू शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
मुंबई
बॉलीवूड
Advertisement