Robot Lawyer : जगातील पहिला रोबोट वकील लढणार केस, कोर्टात करणार युक्तिवाद
Robot Lawyer : हा जगातील पहिला रोबोट वकील असल्याचा दावा कंपनीने केला आहे. रोबोट बनवणाऱ्या कंपनीचे सीईओ जोशुआ ब्रॉउनर यांनी सांगितले, हा कायदा संहिता आणि भाषेचा यांचं संमिश्र स्वरूप आहे.
America : सध्या आधुनिक जगात माणूस अगदी अवकाशातील इतर ग्रहांवरही पोहोचला आहे. दररोज नवनवीन शोध लागत आहेत. येणारा काळ आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञानाचा असणार आहे. अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही या तंत्रज्ञानामुळे सहज शक्य झाल्या आहेत. या तंत्रज्ञानामुळे आधुनिक मशिन्सची भर पडत आहे. येत्या काळात माणसाच्या जागी रोबोट (Robot) काम करताना दिसले तर यामध्ये नवल वाटायला नको. माणसाप्रमाणे काम करणं तर ठिक आहे, पण रोबोट जर वकिलाऐवजी वकिली करु लागला तर... एका कंपनीने जगातील पहिला रोबोट वकील तयार केला आहे. इतकंच नाही तर हा वकील कोर्टात केसही लढणार आहे.
जगातील पहिला रोबोट वकील लढणार केस
अमेरिकेमध्ये जगातील पहिला रोबोट वकील खटला लढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, AI तंत्रज्ञान वापरुन हा रोबोट वकील तयार करण्यात आला आहे. हा जगातील पहिला रोबोट वकील असल्याचा दावा कंपनीने केला आहे. रोबोट बनवणाऱ्या कंपनीचे सीईओ जोशुआ ब्रॉऊनर यांनी सांगितले, हा कायदा संहिता आणि भाषेचा यांचं संमिश्र स्वरुप आहे. AI तंत्रज्ञानाचं हे उत्तम उदाहरण आहे.
कंपनीने या रोबोटबाबत अधिक माहिती देत सांगितले की याआधी हा रोबोट ग्राहकांना फक्त विलंब शुल्क आणि दंड याबद्दल माहिती द्यायचा. पण आता हा रोबोट खटला लढण्यासाठी सक्षम झाला आहे. हा जगातील पहिला रोबोट वकील असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा रोबोट तयार करणाऱ्या कंपनीचे सीईओ जोशुआ ब्रॉऊनर यांनी ही माहिती दिली आहे.
पहिला रोबोट वकील खटला लढणार
AI-सपोर्टेड रोबोट वकील म्हणून केस लढण्याची ही पहिलीच वेळ असेल. कंपनीने हा दावा केला आहे की, हा रोबोट वकील हा स्मार्टफोनवर चालतो. हा रोबोट युक्तिवाद करताना उत्तर इअरपीसद्वारे देईल. हा रोबो दंड आणि दंड भरणे कसे टाळायचे ते सांगेल. सध्या हा रोबोट वकील आपली बाजू कशी मांडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हा रोबोट वकील किती प्रभावी ठरेल हे भविष्यात सिद्ध होईल.
What is AI-Artificial Intelligence : AI म्हणजे काय?
AI म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजेंस (AI-Artificial Intelligence) होय. आर्टिफिशल इंटेलिजेंस हे मशीनला कृत्रिम बुद्धिमत्ता पुरवणारं तंत्रज्ञान आहे. आर्टिफिशल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाद्वारे मशिनला माहिती समजणे, त्याचं विश्लेषण करणे आणि अनुमान काढणे यासाठी मदत करते.
महत्त्वाच्या इतर बातम्या
Robot Cafe : जगातील पहिला रोबोट कॅफे, माणूस नाही फक्त रोबोटच करणार काम