Jio ची राम भक्तांना भेट! अयोध्येत येणाऱ्या भाविकांना मिळणार हायस्पीड इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा
Jio : रिलायन्स जिओकडून राम भक्तांना हाय स्पीड इंटरनेट सुविधेची भेट दिली आहे. त्यामुळे अयोध्येत येणाऱ्या जिओ युजर्सना आता कोणत्याही प्रकारची अडचण येणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई : रिलायन्स जिओकडून (Jio) राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी राम भक्तांना आकर्षक अशी भेट दिली आहे. या क्षणाचे औचित्य साधून जिओकडून एक विशेष सर्विस त्यांच्या युजर्साठी सुरु करण्यात आली आहे. ज्यामुळे आता अयोध्येत (Ayodhya) येणाऱ्या जिओ युजर्सना कोणत्याही प्रकराच्या कनेक्टिविटीसाठी अडचण निर्माण होणार नाही. तसेच हाय स्पीड इंटरनेटची सुविधा देखील आता जिओ युजर्सना मिळणार आहे.
अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला संपूर्ण अंबानी कुटुंबियांनी हजेरी लावली. तसेच आता 23 जानेवारीपासून सामान्यांसाठी अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन खुले होईल. त्यामुळे येत्या काही काळात अयोध्येत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी जिओकडून त्यांच्या कनेक्टीविटीमध्ये अपडेट केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अयोध्येत आलेल्या राम भक्तांना कोणत्याही प्रकारच्या नेटवर्कची अडचण निर्माण होणार नसल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय.
अयोध्येत जिओ युजर्सना नाही येणार अडचण
अयोध्येत झालेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले. तसेच आता जिओकडून इतरही अनेक सुविधा सुरु करण्यात येत आहेत. अयोध्येत हायस्पीड इंटरनेट कनेक्टीविटी सुरु उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची घोषणा जिओकडून करण्यात आलीये. त्यामुळे जिओ युजर्सना अयोध्येत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. अयोध्येत जिओ ट्रू 5जी आणि स्टँडअलोन 5जी नेटवर्क सुधारले जाईल. तसेच अयोध्येत जिओ अतिरिक्त टॉवर्स बसवणार आहे, जेणेकरून संपूर्ण शहरात उत्कृष्ट कॉलिंग आणि डेटा सेवा प्रदान करता येईल. याशिवाय अनेक सेल ऑन व्हील वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. अयोध्येत कॉलिंग किंवा डेटा ऍक्सेस करण्यात काही अडचण आल्यास ते टाळण्यासाठी फास्ट्रॅक तक्रार सुविधा सुरू करण्यात आली आहे.
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला अंबानी कुटुंबाची उपस्थिती
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे अंबानी कुटुंबियांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळे या सोहळ्यासाठी संपूर्ण अंबानी कुटुंबियांनी हजेरी लावली होती. यावेळी मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी, मुलगा आकाश आणि अनंत अंबानी आणि सून श्लोका अंबानी देखील सोबत होते. तसेच त्यांच्यासोबत मुलगी ईशा अंबानी आणि जावई आनंद पीरामल देखील उपस्थित होते.