एक्स्प्लोर

Redmi Note 13 Pro Price : Redmi चा 200 MP कॅमेरा फोनची आजपासून विक्री सुरु, पहिल्याच दिवशी भरघोस सूट!

Redmi Note 13 सीरिजची विक्री आज दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे.  या सीरिजअंतर्गत कंपनीने रेडमी नोट 13, रेडमी नोट 13 प्रो आणि रेडमी नोट 13 प्रो प्लस लाँच केले आहेत.

Redmi Note 13 Pro Price : Redmi Note 13 सीरिजची विक्री(Redmi) आज दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे.  या सीरिजअंतर्गत कंपनीने रेडमी नोट 13, रेडमी नोट 13 प्रो आणि रेडमी नोट 13 प्रो प्लस लाँच केले आहेत. आज दुपारी 12 वाजेनंतर फ्लिपकार्ट, एमआयच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही तिन्ही फोन खरेदी करू शकाल. कंपनी मोबाइल फोनवर ही सूट देत आहे. डिस्काऊंटचा फायदा घेत तुम्ही लाँच प्राइसमधून हे फोन स्वस्तात खरेदी करू शकता. याविषयी जाणून घ्या.

कोणते ऑफर्स मिळतील?

रेडमी नोट 13 5 जी ची किंमत 16,999 रुपयांपासून सुरू होते. या फोनवर कंपनी आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवर 1000 रुपयांची सूट देत आहे. याशिवाय 1,500 रुपयांचा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. त्याचप्रमाणे प्रो आणि प्लस मॉडेलवर 2,000 रुपयांचा कार्ड डिस्काउंट आणि 2,500 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. ऑफर्सचा फायदा घेत तुम्ही स्वस्तात नवीन फोन खरेदी करू शकता. रेडमी नोट 13 5 G सोबत कंपनी 2,999 रुपयांचे स्मार्टवॉच केवळ 1,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी देत आहे. वेबसाईटला भेट देऊन तुम्ही या विषयाची अधिक माहिती मिळवू शकता.  

रेडमी नोट 13 प्रो प्लस  फीचर्स 

रेडमी नोट 13 प्रो प्लसमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा 1.5 के ओएलईडी डिस्प्ले आहे. स्क्रीन ब्राइटनेस जास्तीत जास्त 1,800 निट्सपर्यंत वाढवता किंवा कमी केली जाऊ शकते. कर्व्ह्ड पॅन डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देण्यात आला आहे. रेडमी नोट 13 प्रो प्लस मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7200 अल्ट्रा चिपसेट असेल. यात 16 जीबी रॅम आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेज मिळेल. फोनमध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी असणार आहे. चार्ज करण्यासाठी 120 वॉट फास्ट चार्जिंग (वायर्ड) सपोर्ट मिळेल.फोटोग्राफीच्या दृष्टीने रेडमी नोट 13 प्रो प्लस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यामध्ये तंत्रज्ञानावर आधारित 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.

रेडमी नोट 13 प्रोमध्ये मिळणार हे फीचर्स

रेडमी नोट 13 प्रो आगामी फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 चिपसेट मिळेल. यात 5100 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ज्यात चार्ज करण्यासाठी 67 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. फोनमध्ये IP68 रेटिंग फीचर मिळणार नाही. फोनची स्क्रीन फ्लॅट असेल.

रेडमी नोट 13 चे स्पेसिफिकेशन्स उपलब्ध 

रेडमी नोट 13 फोनमध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले साइज आहे. अमोलेड डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080 पी, रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे. 1000 निट्स वजा करून स्क्रीनची ब्राइटनेस वाढवता येते. त्याच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ आहे. रेडमी नोट 13 मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6080 प्रोसेसर आहे. यात 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 13 मध्ये 100 मेगापिक्सलप्रायमरी सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ज्यात चार्ज करण्यासाठी 33 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. धूळ आणि पाण्याच्या संरक्षणासाठी याला केवळ IP54  रेटिंग आहे.चिनी बाजारात उपलब्ध रेडमी नोट 13 सीरिजचे सर्व फोन अँड्रॉइड 13-आधारित  MIUI 1414 सॉफ्टवेअरवर काम करतात. भारतात येणारे हँडसेटही याच सॉफ्टवेअरवर चालतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

इतर महत्वाची बातमी-

WhatsApp Security Tips : 'या' तीन प्रकारे सुरक्षित करा तुमचं Whatsapp अकाऊंट, नाहीतर पर्सनल डेटा गेलाच म्हणून समजा!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
VIDEO : नितेश राणेंकडून भास्कर जाधवांचं कौतुक, बाजूला बसलेल्या आदित्य ठाकरेंनी लगेच मिठी मारली, सभागृहात काय घडलं?
VIDEO : नितेश राणेंकडून भास्कर जाधवांचं कौतुक, बाजूला बसलेल्या आदित्य ठाकरेंनी लगेच मिठी मारली, सभागृहात काय घडलं?
Pune Crime News: विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा...पुण्यातील धक्कादायक प्रकार
विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा...पुण्यातील धक्कादायक प्रकार
Kolhapur Collectorate Office: पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
VIDEO : नितेश राणेंकडून भास्कर जाधवांचं कौतुक, बाजूला बसलेल्या आदित्य ठाकरेंनी लगेच मिठी मारली, सभागृहात काय घडलं?
VIDEO : नितेश राणेंकडून भास्कर जाधवांचं कौतुक, बाजूला बसलेल्या आदित्य ठाकरेंनी लगेच मिठी मारली, सभागृहात काय घडलं?
Pune Crime News: विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा...पुण्यातील धक्कादायक प्रकार
विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा...पुण्यातील धक्कादायक प्रकार
Kolhapur Collectorate Office: पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Kritika Kamra Gaurav Kapur: रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
Mexico Tarrif on India: डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
Dhurandhar Movie: 'धुरंधर'चा देशात कमाईचा धुमधडाका, पण पाकिस्तान विरोधाची मिर्ची लागल्याने 'या' सहा देशांनी थेट बॅन केला!
'धुरंधर'चा देशात कमाईचा धुमधडाका, पण पाकिस्तान विरोधाची मिर्ची लागल्याने 'या' सहा देशांनी थेट बॅन केला!
Embed widget