(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Online Gaming Career : गेम खेळून 6 ते 12 लाख रुपये कमवा, ई-गेमिंगमध्ये करिअर बनू शकते का? पाहा A to Z माहिती...
सध्या भारतात अनेक क्षेत्रात तरुण आपलं नशीब आजमवताना दिसत आहे. त्यात ऑनलाईन गेमिंग ही तरुणांसाठी नवी संधी आहे. भारतातील ऑनलाइन गेमिंग मार्केट झपाट्याने वाढत आहे.
Online Gaming Career : सध्या भारतात अनेक क्षेत्रात (Online Gaming Career) तरुण आपलं नशीब आजमवताना दिसत आहे. त्यात ऑनलाईन गेमिंग ही तरुणांसाठी नवी संधी आहे. भारतातील ऑनलाइन गेमिंग मार्केट झपाट्याने वाढत आहे. यात 2022 च्या तुलनेत 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतीय गेमर्सने 2023 मध्ये वार्षिक 6 ते 12 लाख रुपये कमावले आहेत, असा दावा गेमर्सवर तयार करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये केला आहे. देशातील ऑनलाइन गेमिंग उद्योग झपाट्याने विकसित होत असून येत्या काही वर्षांत तरुण गेमर्स गेमर्स गेमर्स म्हणून करिअर करू शकतात, असं HP ने सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे.
HP चे वरिष्ठ संचालक विक्रम बेदी म्हणाले की, देशात ई-गेमिंग उद्योग वेगाने विस्तारत आहे आणि येत्या काळात त्याला करिअरचे चांगले पर्याय मिळतील. ई-गेमिंग क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्याची ताकद भारतीय तरुणांमध्ये असून येत्या काळात या उद्योगाची झपाट्याने वाढ होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
3000 गेमर्सचे सर्वेक्षण
एचपीने आपल्या अहवालासाठी देशभरातील 15 शहरांमधील 3000 गेमर्सचे सर्वेक्षण केले, ज्यात त्यांनी त्यांच्या उत्पन्नाचीदेखईल माहिती दिली आहे. यात 3000 वेगवेगळ्या गेमर्सची माहिती घेण्यात आली होती. त्यांचा वेळ, खेळण्याची पद्धत आणि त्यांचं उत्पन्न किती याची संविस्तर माहिती एकत्र करुन हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणातून त्यांनी करिअर करण्याच्या दृष्टीने चांगला मार्ग असू शकतो हे सांगितलं आहे.
गेमिंगमध्ये करिअर
मेट्रो शहरांबरोबरच नॉन-मेट्रो आणि शहरी तरुणही ऑनलाइन गेमिंगमध्ये सहभागी होत आहेत. या अहवालातील सर्वात मजेशीर बाब म्हणजे एकूण गेमर्सपैकी 58 टक्के महिला आहेत. त्याचबरोबर पालकांचा गेमिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. आता पालकही करिअरच्या दृष्टीने गेमिंग क्षेत्राकडे पाहू लागले आहेत. त्याचबरोबर गेमिंग कोर्सेसबाबत अजूनही जागरुकतेचा अभाव आहे. ज्यामुळे गेमर्स यूट्यूबच्या माध्यमातून गेमिंग स्किल्सला प्रोत्साहन देत आहेत.
भारतीय तरुणांना मोठी संधी
भारतीय तरुणांमध्ये केवळ जागतिक ई-गेमिंह क्षेत्रात मोठे स्थान मिळविण्याची क्षमता नाही तर उद्योगातील संधींचा फायदा घेण्याची क्षमता देखील आहे. एचपी इंडिया मार्केटचे पर्सनल सिस्टिम्सचे वरिष्ठ संचालक विक्रम बेदी म्हणाले, "एचपीमध्ये आम्ही एचपी गेमिंग गॅरेजसारखे उपक्रम सुरू करत आहोत जेणेकरून गेमर्सविकसित करण्यास मदत होईल आणि अनेक तरुण या क्षेत्रात काम करु शकतील.
इतर महत्वाची बातमी-