Oneplus12 Vs Samsung Galaxy S24 : Oneplus12 की Samsung Galaxy S24 कोणता फोन आहे भारी? फिचर्स जाणून घ्या!
दोन्ही फोन आपापल्या सेगमेंटमध्ये चांगले असणार आहेत. वनप्लस फोनमध्ये नवीन चिपसेट, उत्तम कॅमेरा, वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि अँड्रॉइड 14 सपोर्ट मिळेल. त्याचबरोबर कंपनी सॅमसंगच्या फोनमध्ये टायटॅनियम फ्रेम्स देणार आहे.
Oneplus12 Vs Samsung Galaxy S24 : आज चीनमध्ये वनप्लस 12 स्मार्टफोन थोड्या वेळाने लाँच होणार आहे. क्वालकॉमचा नवा चिपसेट या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असल्याचे सांगितलं जात आहे. याशिवाय वायरलेस चार्जिंगलाही सपोर्ट करणार आहे. जे फिचर वनप्लसमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. हे स्मार्टफोन जानेवारीत भारतात लाँच केले जातील. वनप्लसव्यतिरिक्त सॅमसंगदेखील आपला नवा प्रीमियम फोन लाँच करणार आहे. Samsung Galaxy S 24 बाबतही अनेक फिचर्स लीक झाले आहे. याच लीक झालेल्या फिचर्सवरुन दोन्ही फोन कसे आहेत आणि कोणता फोन खरेदी करायला हवा हे सांगणार आहोत.
Oneplus 12 चे फिचर्स
वनप्लस 12 मध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 SoC मिळण्याची अपेक्षा आहे. जी आपल्याला उत्कृष्ट परफॉर्मन्स देईल. यात BOE X1 OLED LTPO डिस्प्ले असेल जो क्रिस्टल-क्लिअर 2K रिझोल्यूशनचा आहे. आयक्यूओ 12 5 G मध्ये 64 MP टेलिफोटो कॅमेरा कंपनी आहे जी 100 X झूमिंगसह येते. याशिवाय फोनमध्ये 50 MP प्रायमरी सेन्सर, 32 MP सेल्फी कॅमेरा आणि 100 W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5,400 mAh दमदार बॅटरी मिळेल.
Samsung Galaxy S24 चे फिचर्स
Samsung Galaxy S24 या सीरिजबद्दल बोलायचं झालं तर 17 जानेवारीला भारतात लाँच केले जाऊ शकते. या फोनमध्ये अॅल्युमिनियमऐवजी टायटॅनियम फ्रेम मिळेल आणि फ्लॅट डिस्प्ले असेल. लीक झालेल्या माहितीनुसार, सीरिजच्या ग्लोबल व्हेरियंटला Exynos चिप आणि भारतीय व्हेरियंटमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 SoC सपोर्ट मिळू शकतो. गॅलेक्सी S 23 अल्ट्राप्रमाणेच यावेळीही S 24 अल्ट्रामध्ये 200 MPचा कॅमेरा मिळणार आहे. तसेच फोनमध्ये अनेक AI फीचर्सही मिळणार आहेत.
कोणता फोन उत्तम असेल?
दोन्ही फोन आपापल्या सेगमेंटमध्ये चांगले असणार आहेत. वनप्लस फोनमध्ये नवीन चिपसेट, उत्तम कॅमेरा, वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि अँड्रॉइड 14 सपोर्ट मिळेल. त्याचबरोबर कंपनी सॅमसंगच्या फोनमध्ये टायटॅनियम फ्रेम्स देणार आहे, तसेच यात AI फीचर्स मिळणार आहेत.दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीतही बराच फरक आहे. आपल्या गरजेनुसार आपल्यासाठी काय चांगले आहे हे आपण ठरवू शकता. सॅमसंगचा हा फोन फोटोग्राफीच्या दृष्टीने उत्तम असेल कारण तो चांगल्या झूमिंगसह लाँच होणार आहे. भारतात लाँच झाल्यावर दोन्ही फोन बघा आणि मगच खरेदी करा.
इतर महत्वाची बातमी-