प्रतीक्षा संपली! प्रीमियम स्मार्टफोन OnePlus 11R ची प्री-ऑर्डर उद्यापासून सुरू, 'या' दिवसापासून सुरू होईल विक्री
OnePlus 11R : OnePlus ने 7 फेब्रुवारी रोजी क्लाउड 11 इव्हेंटमध्ये त्यांचा प्रीमियम OnePlus 11 सीरिज अंतर्गत OnePlus 11 आणि OnePlus 11R हे दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते.
OnePlus 11R : OnePlus ने 7 फेब्रुवारी रोजी क्लाउड 11 इव्हेंटमध्ये त्यांचा प्रीमियम OnePlus 11 सीरिज अंतर्गत OnePlus 11 आणि OnePlus 11R हे दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते. OnePlus 11 ची विक्री 14 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे, परंतु OnePlus 11R ची विक्री सुरू झाली नाही. आता हा फोन लवकरच युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. OnePlus 11R उद्यापासून म्हणजेच 21 फेब्रुवारीपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असेल. फोनची विक्री 28 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
OnePlus 11R किंमत
OnePlus 11R दोन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनच्या बेस मॉडेलची किंमत 39,999 रुपये आहे आणि 16GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 44,999 रुपये आहे. फोनसाठी प्री-ऑर्डर 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे आणि 28 फेब्रुवारीपासून डिव्हाइस खरेदीसाठी उपलब्ध होईल. फोन सोनिक ब्लॅक आणि गॅलेक्टिक सिल्व्हर या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
OnePlus 11R चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: HDR10+ सह 6.7-इंच AMOLED डिस्प्ले आणि समोर पंच-होल कटआउट
- रीफ्रेश दर: 120Hz रिफ्रेश रेट
- मागील कॅमेरा: ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर
- फ्रंट कॅमेरा: 16MP सेल्फी कॅमेरा
- प्रोसेसर: Qualcomm Snapdragon 8+ Gen1 चिपसेट
- ऑपरेटिंग सिस्टम: Android 13 वर आधारित OxygenOS
- चार्जिंग: 100W फास्ट चार्जिंग
- बॅटरी: 5,000mAh बॅटरी
OnePlus 11R 16GB पर्यंत RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह जोडलेले आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार वाढू शकता. कंपनीने म्हटले आहे की, OnePlus 11R ला तीन अँड्रॉइड अपडेट्स आणि चार वर्षांचे सिक्युरिटी अपडेट मिळतील. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि अलर्ट स्लाइडर आहे.
Vivo V27 सीरिजची लॉन्चिंग डेट झाली फिक्स
Vivo V27 ची अधिकृत लॉन्च तारीख समोर आली आहे. Vivo ने 1 मार्च रोजी भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केल्याची पुष्टी केली आहे. फ्लिपकार्ट लिस्टमधून फोनचे अनेक फीचर्स आधीच समोर आले आहेत. या सीरीजअंतर्गत तीन मॉडेल लॉन्च केले जाऊ शकतात. ज्यात Vivo V27, Vivo V27 Pro आणि Vivo V27E यांचा समावेश असू शकतो.
इतर टेक बातमी: