(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nothing Phone 2 vs OnePlus 11R : आता Nothing Phone 2 देणार OnePlus 11R ला टक्कर ; हे आहेत भन्नाट फिचर्स
Nothing चा हा फोन 44,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन OnePlus फ्लॅगशिप किलर OnePlus 11R ला थेट टक्कर देतो.
Nothing Phone (2) vs OnePlus 11R : Nothing ने भारतात आपला दुसरा स्मार्टफोन Nothing Phone 2 लॉन्च केला आहे. जर तुम्ही या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स बघितले तर त्याची तुलना OnePlus 11R शी केली जाते. नथिंग आणि वनप्लस हे दोन्ही स्मार्टफोन एकाच क्वालकॉम प्रोसेसरसह येतात. Nothing चा हा फोन 44,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन OnePlus फ्लॅगशिप किलर OnePlus 11R ला थेट टक्कर देतो. Nothing आणि OnePlus च्या या दोन फोनचे स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि किंमत याबद्दल जाणून घेऊयात.
फिचर्स
Nothing Phone 2 मध्ये पंच होलसह 6.7-इंचाचा FHD + डिस्प्ले आहे, जो एक लवचिक OLED स्क्रीन आहे. डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेट, 1600 nits ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास वापरण्यात आला आहे. तर OnePlus 11R मध्ये 6.7-इंचाची FHD + पंच-होल स्क्रीन आहे. हा डिस्प्ले सुपर फ्लुइड AMOLED पॅनेलवर बनवला आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेटवर काम करतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
प्रोसेसर
Nothing Phone 2 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 Octa Core प्रोसेसर 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार केलेला आहे. हा चिपसेट 3 GHz वेगाने क्लॉक करण्यात आला आहे. हे ग्राफिक्स सपोर्टसाठी Adreno 730 GPU ला सपोर्ट करते. OnePlus 11R 5G फोनबद्दल बोलायचे झाले तर क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 3.2 GHz वर क्लॉक आहे. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये Adreno 730 GPU देखील देण्यात आला आहे. OnePlus आणि Nothing हे दोन्ही फोन Android 13 वर चालतात
कॅमेरा
नथिंग फोन 2 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर 50MP Sony IMX890 आहे, ज्यामध्ये 50MP सेकेंडरी अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन (EIS) देखील Nothing Phone 2 मध्ये उपलब्ध आहे. वनप्लस फोनमध्ये ट्रिपल रिअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX890 सेन्सर आहे, ज्यामध्ये 8MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 2MP मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे.
फ्रंट कॅमेरा
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर, नथिंग फोन (2) 32MP Sony IMX615 फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर वनप्लस फोनमध्ये 16MP सेंसर देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये पंच होल कटआउट उपलब्ध आहे.
बॅटरी आणि चार्जिंग
Nothing Phone 2 मध्ये 4,700mAh ची बॅटरी आहे. या फोनला 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. यासोबतच फोनमध्ये 15W वायरलेस चार्जिंग आणि 5W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग उपलब्ध आहे. OnePlus 11R बद्दल बोलायचे झाले तर यात 5,000mAh ची बॅटरी आहे. हा OnePlus फोन 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग उपलब्ध नाही.
5G कनेक्टिव्हिटी
5G कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास, नथिंग फोन (2) मध्ये 5G चे 19 बँड उपलब्ध आहेत. यासोबतच OnePlus 11R मध्ये 5G चे 9 बँड उपलब्ध आहेत. दोन्ही फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट आणि 4G LTE सपोर्ट उपलब्ध आहे.
किंमत
Nothing Phone 2 स्मार्टफोन तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या फोनचा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 44,999 रुपयांच्या किंमतीत येतो. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे आणि 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 54,999 रुपये आहे. OnePlus 11R दोन प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह त्याचा बेस व्हेरिएंट 39,999 रुपये किंमतीला येतो. फोनचा टॉप व्हेरिएंट 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 44,999 रुपयांमध्ये येतो.
इतर महत्वाच्या बातम्या