(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amazon Prime Day Sale : खुशखबर! अॅमेझॉन प्राईम डेचा सेल सुरू; iPhone, MacBook आणि Apple Watch वर बंपर ऑफर
तुम्ही अॅमेझाॅन प्राईमचे (Amazon Prime) मेंबर असाल तर तुमच्याकरता आनंदाची बातमी. दिग्गज ई-कॉमर्स (E-Commerece) कंपनी अॅमेझॉनवर 15 आणि 16 जुलै या दोन दिवसांकरता ही बंपर ऑफर सुरू असणार आहे.
Amazon Prime Day Sale 2023 : जर तुम्ही अॅमेझाॅन प्राईमचे (Amazon Prime) मेंबर असाल तर तुमच्याकरता आनंदाची बातमी. दिग्गज ई-कॉमर्स (E-Commerece) कंपनी अॅमेझॉनवर 15 आणि 16 जुलै या दोन दिवसांकरता ही बंपर ऑफर सुरू असणार आहे. या सेल दरम्यान, प्राईम मेंबर्ससाठी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विशेष डिस्काउंट आणि खास ऑफर्स देण्यात आल्या आहेत. तसेच या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर एक्सचेंज ऑफर आणि कॅशबॅक पर्याय देखील तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही जर iPhone, MacBook आणि iPad खरेदी करण्याकरता उत्सुक असाल तर या सुरू झालेल्या सेलचा पुरेपूर फायदा तुम्हाला होऊ शकतो.
iPhone 14
आयफोन 14 लाइनअप सप्टेंबर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आला होता आणि बेस मॉडेल ब्लू, मिडनाईट, पर्पल, रेड आणि यलो सारख्या विविध रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांकरता उपलब्ध आहेत. त्याच्या सुरुवातीच्या रिलीजवर, iPhone 14 च्या 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 79,990 रुपये होती. मात्र आता प्राइम डे सेल दरम्यान, Apple हँडसेटची किंमत 65,999 रुपये आहे. हा फोन A15 Bionic SoC वर आधारित आहे आणि यात 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे.तर कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला मागील बाजूस 12 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे मिळतात आणि समोर सेल्फीसाठी 12 मेगापिक्सेल कॅमेरा देखील देण्यात आला आहे. आयफोन 14 एका चार्जवर 20 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅक ऑफर करतो.
MacBook Air 2020 M1
MacBook Air 2020 M1 चिपसेटवर आधारित आहे आणि त्यात 2,560x1,600 पिक्सेल आणि 227ppi च्या पिक्सेल घनतेसह 13.3-इंचाचा LED-बॅकलिट IPS डिस्प्ले आहे. हा मॅकबुक 30W USB Type-C चार्जिंगला सपोर्ट करतो आणि एका चार्जवर 18 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅक सपोर्ट करतो. मॅकबुकची लाँच किंमत ही 92,900 आहे मात्र अॅमेझॉन प्राईमच्या सेलमध्ये ही किंमत 81,990 असणार आहे. जर तुम्ही EMI घेणार तर तो 3,917 रुपयांपासून तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे. तसेच No Cost EMI हा पर्याय देखील ग्राहकांकरता देण्यात आला आहे.
Apple Watch Series 8
16 सप्टेंबर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. Apple Watch Series 8 ला 60 तासांची बॅटरी लाईफ असून यामध्ये लो पॉवर मोड देखील दिला गेला आहे. जो पूर्ण चार्ज केल्यावर 36 तासांची बॅटरी देण्यास सक्षम आहे. Apple Watch Series 8 मिडनाईट स्टारलाइट, सिल्व्हर आणि प्रॉडक्ट रेड कलर पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. या Apple Watch Series 8 ची किंमत 45,900 रुपये आहे. पण Amazon प्राईम डे सेल दरम्यान हे Apple Watch 32,990 रूपयांना ग्राहकांकरता उपलब्ध करून देण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Smartphone : Infinix Hot 30 5G स्मार्टफोन भारतात लॉंच, बॅटरी-कॅमेरासह मिळतील 'हे' फिचर्स