एक्स्प्लोर
Netflix वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' उपकरणांवर सेवा होणार बंद
काही काळातच भारतात प्रसिद्धीस पावलेल्या नेटफ्लिक्सची सेवा आता काही उपकरणांवर बंद असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आलेली आहे.
नवी दिल्ली : नेटफ्लिक्सच्या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे. नेटफ्लिक्सची सेवा डिसेंबरपासून काही उपकरणांवर बंद होणार नाही. काही तांत्रिक कारणामुळे ही सेवा या उपकरणांवर मिळणार नसल्याची माहिती आहे. कंपनीकडून याबद्दल खुलासा करण्यात आला आहे. 2010 आणि 2011 मधील काही सॅमसंग टीव्ही संचात जुने सॉफ्टवेअर असल्यामुळे 1 डिसेंबरनंतर यावर Netflix चालवता येणार नाही.
नेटफ्लिक्सने हे पण सांगितले, की जुन्या रोकु प्लेयर्सवर डिसेंबरपासून नेटफ्लिक्स चालणार नाही. जर यूजरचा नेटफ्लिक्स अॅप ऑटोप्ले नेक्स्ट करत नसेल तर याचा अर्थ तुमच्या उपकरणावर यापुढे नेटफ्लिक्स चालणार नाही.
या उपकरणांवर यापुढे नेटफ्लिक्स उपलब्ध होणार नसल्याची माहिती नेटफ्लिक्स कंपनीकडून दिली जात आहे. कारण, मीडिया प्लेअर्सची निर्मीती करणाऱ्या रोकु कंपनीने 2015 मध्येच याबद्दल माहिती देताना सांगितले होते, की 2011 आणि त्याअगोदरचे प्लेअर्सला अपडेट मिळणार नाही. परिणामी यावर नेटफ्लिक्स चालवता येणार नाही.
काय आहे नेटफ्लिक्स?
नेटफ्लिक्स ही व्हिडियो स्ट्रिमिंग वितरीत करणारी कंपनी आहे. याद्वारे तुम्ही चित्रपट, माहितीपट, शो, टेलिव्हिजन शो इ. मोबाईल, संगणक किंवा टीव्हीवरही पाहू शकता. यासाठी तुम्हाला ठराविक रक्कम मोजावी लागते.
संबंधित बातम्या :
आता फक्त 250 रुपयांत महिनाभर चालणार नेटफ्लिक्स, भारतीयांसाठी सर्वात स्वस्त प्लान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement