Netflix झटका देण्याच्या तयारीत, या युजर्सना ऑफलाईन कंटेट पाहता येणार नाही, लवकरच येणार अपडेट
Netflix Offline Download Feature : नेटफ्लिक्स विंडोज युजर्ससाठी ऑफलाईन कंटेट सेवा बंद करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Netflix May Disable Offline Download for Windows : आघाडीचं ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) लवकरच ग्राहकांना झटका देण्याच्या तयारीत आहे. नेटफ्लिक्स काही युजर्ससाठी ऑफलाईन कंटेट पाहण्याची सेवा बंद करण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे काही युजर्सना यासंदर्भात अलर्टही मिळाला आहे. नेटफ्लिक्स विंडोज युजर्ससाठी ऑफलाईन कंटेट सेवा बंद करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही नेटफ्लिक्स डेस्कटॉप युजर्सना हा अलर्ट आला आहे. लवकरच नेटफ्लिक्सचं अपडेट व्हर्जन येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
नेटफ्लिक्स झटका देण्याच्या तयारीत
नेटफ्लिक्स एक आघाडीचे ओटीटी प्लॅटफॉर्म असून याचे जगभरात मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. हॉलिवूडपासून बॉलिवूडसह विविध भाषेंमधील कंटेट तुम्हाला नेटफ्लिक्सवर उपलब्ध होतो. नेटफ्लिक्सवर उत्तम कंटेट आणि सुविधा उपलब्ध आहेत. यातीलच एक म्हणजे ऑफलाईन कंटेट पाहण्याची सुविधा म्हणजेच विना इंटरनेट कंटेट पाहण्याची सेवा. यासाठी युजरला आधी कंटेट डाऊनलोड करावा लागतो, त्यानंतर तो कंटेट ऑफलाईन पाहता येतो. पण, आता नेटफ्लिक्स काही युजर्ससाठी ऑफलाईन कंटेट सेवा बंद करण्याच्या तयारीत आहे.
या युजर्सना ऑफलाईन कंटेट पाहता येणार नाही
एका मीडिया रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्स डेस्कटॉप युजर्ससाठी ऑफलाईन कंटेट सेवा बंद करण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास डेस्कटॉप युजर्सला कंटेट डाऊनलोड करून तो ऑफलाईन पाहता येणार नाही. नेटफ्लिक्स विंडोजसाठी त्याची ऑफलाइन डाउनलोड सेवा बंद करू शकते, अशी बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटफ्लिक्स विंडोज ॲप वापरणाऱ्या काही युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत माहिती दिली आहे की, त्यांना नेटफ्लिक्स विंडोज ॲपवर ऑफलाईन सेवा बंद होणार असल्याचा अलर्ट मेसेज मिळत आहे.
नेटफ्लिक्सचा युजर्सना अलर्ट
एचटी टेकच्या अहवालात असं म्हटलं आहे की, आर्टेम रुसाकोवास्की नावाच्या युजरने X वर नेटफ्लिक्स अलर्टसह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, नवीन विंडोज ॲपचा अनुभव लवकरच उपलब्ध होईल. या अपडेटनंतर, डाउनलोड फिचर सपोर्ट होणार नाही, पण तुम्ही मोबाईलवर कोणतीही वेब सीरीज आणि चित्रपट डाऊनलोड करुन ऑफलाइन पाहू शकाल. ज्यांना प्रवास करताना लॅपटॉपवर नेटफ्लिक्स बघायला आवडते त्यांच्यावर या अपडेटचा परिणाम होईल.
मासिक सबस्क्रिप्शन घेणाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता
याशिवाय, आणखी एका यूजरने X वर एक पोस्ट देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, मला देखील एक अलर्ट मिळाला आहे, पण त्यात डाउनलोड फीचरबद्दल काहीही सांगितलं गेलेलं नाही. पण, अद्याप नेटफ्लिक्सने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.